who is George Oxenden mns raj Thackeray mention in alibaug visit jamin parisha marathi article  
महाराष्ट्र बातम्या

Surat Attack : सुरत हल्ला अन् इंग्रजांचे साम्राज्य वाढवणारा तो अधिकारी! राज ठाकरेंनी उल्लेख केलेला तो जॉर्ज ऑक्झेंडन कोण?

राज ठाकरे यांनी इतिहासातील एक घटनेचा उल्लेख केला असून त्यांनी जॉर्ज ओकझेंड नावाच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांने गुजरातेत व्यापारासाठी मुघलांकडून सवलत मिळवून घेतली याबद्दलची ही घटना सविस्तर सांगितली आहे.

रोहित कणसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (सोमवार) अलिबाग येथे जमीन परिषद पार पडली. यावेली राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील तरुण कर्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत, एकदा जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपेल, जमीन आहे तर तुम्ही आहात.. त्यामुळे कधीच जमिनी विकू नका, असं आवाहन केलं. यासोबतच आपल्या राज्य, भाषा यासाठी तरुणांनी कसं जागरुक असावं याबद्दल देखील मार्गदर्शन केलं.

यावेळी राज ठाकरे यांनी इतिहासातील एक घटनेचा उल्लेख देखील केला आहे. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर स्वारी केली तेव्हा जॉर्ज ऑक्झेंडन या ब्रिटीश अधिकाऱ्याने गुजरातेत व्यापारासाठी मुघलांकडून सवलत कशी मिळवून घेतली याबद्दलची ही घटना सविस्तर सांगितली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, स्वतःच्या राज्यासाठी माणूस कसा अलर्ट असावा याचं एक उदाहरण मी सांगतो, छत्रपती शिवरायांची जेव्हा सुरतेवर स्वारी झाली होती तेव्हा, महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि ते सुरतेतील व्यापाऱ्यांना पत्र पाठवत होते. तेव्हा तेथे ईस्ट इंडिया कंपनी देखील होती. त्या कंपनीच्या वखारींचा जो प्रमुख होता त्यांचं नाव होत, जॉर्ज ओकझेंड. हा कोण? तर तुम्ही शिवराज्याभिषेकाचं चित्र पाहिलं असेल तर त्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय, तो हेनरी ऑक्झेंडन त्याचा हा चुलत भाऊ, त्याच्या हाताखाली चार-पाचशे अधिकारी होते असेही राज ठाकरे यांनी सांगितलं.

महाराजांनी जेव्हा पत्र पाठवली तेव्हा या इस्ट इंडिया कंपनीला देखील पत्र गेलं, त्याने परत पत्र पाठवलं की तुम्ही सांगताय ते आम्हाला मान्य नाही आम्ही ते करणार नाही. इतर व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. तेव्हा तेथील औरंगजेबाचा जो वजीर होता त्याचं नाव इनायत खान होतं, त्याने वकिल पाठवला. त्या वकिलाने महाराजांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर महाराज आणि मावळे सुरतेत घुसले.

त्यावेळी हा इनायत खान सुरतेच्या डोंगरात पळून गेला आणि सुरत मोकळी पडली. त्यावेळी जॉर्ज ऑक्झेंडनने लोकांना विश्वास दिला. तेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली सर्व संकट संपलं. त्यानंतर औरंगजेबाचा आणखी एक खास माणूस महाबत खान तिथं आला. त्यावेळी इनायत खान डोंगर उतरत होता तेव्हा त्याला लोकांनी चपलेने मारत. तेव्हा त्याने महाबत खानला सांगितलं की, या इंग्रज अधिकाऱ्यांने लोकांना बळ दिलं.

तेव्हा महाबत खानने स्वतःजवळची हिऱ्या मोत्यानी मढवलेली तलवार काढली आणि त्याला दिली. जॉर्ज ओकझेंडने ती भेट नाकारली. महाबत खान म्हणाला की, तु असं समज की आमच्या बादशाहने ही भेट पाठवली आहे आणि ती स्वीकार कर. तेव्हा त्या जॉर्ज ऑक्झेंडन म्हणाला की, तुमच्या बादशाहला आमला काही द्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी पन्नास टक्के सवलत द्या, साम्राज्य असं वाढत असतं.

त्यावेळी राणी-राजा कोण असेल माहिती नाही, त्यांना इथे जॉर्ज ऑक्झेंडन असा कोणी अधिकारी आहे हे त्यांना माहिती देखील नसेल. पण स्वतःचा झेंडा, जमीन, भाषेसाठी हा कोण, कुठचा अधिकारी अशी गोष्ट बोलतो तर तम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलेले भूमीपूत्र आहेत असे राज ठाकरे म्हणाले. यातून माझी जमीनीसाठी माणसं कशी प्रामाणिक असतता ज्याच्यातून साम्राज्य मोठी होतात हे दिसून येतं असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT