Who is Puja Khedkar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Puja Khedkar: ऑडीमुळे अडचणीत आलेली IAS पूजा खेडकर कोण? दिव्यांग सर्टिफिकेटचाही घातलाय घोळ?

अंकिता खाणे (Ankita Khane)

Trainee IAS officer Pooja Khedkar: पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण देखील तसंच आहे. पूजा खेडकरची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर आता वाशिमची जिल्हाधिकारी असणार आहेत. स्वतंत्र केबिन आणि कर्मचारी अशा मागण्यांवरून वाद निर्माण केल्यानंतर पुण्यात तैनात असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिची मध्य महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची मागणी

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अधिकृत पत्रात म्हटले आहे की 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकरची तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. ती 30 जुलै 2025 पर्यंत तेथे सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करेल.

पूजा खेडकरने चमकेगिरी केल्याने तिची बदली करण्यात आली आहे. व्हिआयपी नंबरप्लेट असलेल्या ऑडी कारला लाल आणि निळा दिवा लावणं, पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच निवासी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्स अॅप मेसेज करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवासस्थान आणि शिपाई या संबंधीची मागणी तिने केली. त्यानंतर प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून याबाबत विचारणा करत असल्याकारणाने तिची आता वाशिमला बदली करण्यात आली आहे.

त्याचबरोबर असा दावा देखील करण्यात आला आहे की, पूजाने तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता. तिथे तिने तिच्या नावाचा बोर्ड देखील लावली होता. पूजाच्या या वागणुकीबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित IAS पूजा खेडकर हिची तक्रार केली होती. ज्यामुळे आता तिची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.

कोण आहे पूजा खेडकर?

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने २०२१ मध्ये UPSC परिक्षा उत्तीर्ण केली. या परिक्षेत तिचा आखिल भारतीय क्रमांक ८२१ होता. तिने स्वत:ला दिव्यांग घोषित केले असल्याची माहिती समोर आली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती. पूजाचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना एससी/एसटी उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांनाही समान लाभ मिळावा.

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात काय म्हटले आहे?

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवस यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या अहवालानुसार, 3 जून रोजी कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच खेडकरने त्यांच्याकडे स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि एक शिपाई देण्याची मागणी वारंवार केली होती.

तिला सांगण्यात आले की, तिला तिच्या प्रोबेशन कालावधीत या सुविधांचा अधिकार नाही, आणि तिला राहण्याची सोय केली जाईल. दिवसे यांनी जीएडीला दिलेल्या अहवालात खेडकरने पुण्यात प्रशिक्षण सुरू ठेवू देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढून टाकल्याचा आरोपही तिच्यावर आहे.

लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली त्यांची वैयक्तिक ऑडी कारही तिने वापरली, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. तिने तिच्या वैयक्तिक गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड देखील लावला होता. नियमानुसार प्रशिक्षणार्थींना वरील सुविधा पुरविल्या जात नसून त्याला प्रथम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे.पूजा खेडकरला हे विशेषाधिकार मिळाले नसतानाही तिने आपल्या कृतीतून प्रशासनात खळबळ उडवून दिली.

यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील (एमपीसीबी) निवृत्त अधिकारी असलेले वडील दिलीपराव खेडकर हे आपल्या प्रभावाचा वापर करून जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुलीने केलेल्या मागण्यासाठी दबाव आणत होते, असाही आरोप आहे.

पूजा खेडकर हिने तिच्या खाजगी वाहनावर लाल-निळ्या दिव्यांचा वापर केला होता, ज्याचा फोटो व्हायरल झाला होता आणि ती प्रकोशझोतात आली होती. याशिवाय अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याही नकळत तिने त्यांच्या चेंबरवर कब्जा केला असावा, असा अंदाज आहे.

पूजा खेडकर ही २०२२ च्या बॅचची IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे. तिने UPSC परीक्षेत 821 (Pwd-5) रँक मिळवल्याचे सांगितले जाते. ती पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाली होती. मात्र आता तिची वाशिम येथे बदली झाली आहे. तिच्या वडिलांसोबत, पूजा खेडकरचे आजोबाही सरकारी कर्मचारी होते. तिची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या निवडून आलेली सरपंच आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून, तिच्या कायमस्वरूपी नियुक्तीपूर्वी तिने विविध विभागांमध्ये काम करणे अपेक्षित होते.

नियुक्ती आणि प्रशासकीय नोकरी मिळण्याच्या संशयास्पद वागणुकीमूळे ती इंटरनेटवर पसरली आहे. 2 फेब्रुवारी 2022 रोजी पूजा खेडकरला नियुक्ती नाकारण्यात आली, त्यानंतर तिने दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान चार वेळा तिची वैद्यकीय तपासणी केली. ती चारही वेळा हजर राहू शकली नाही आणि त्यामुळे न्यायाधिकरणाने तिला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. 2023 मध्ये, तिचे प्रतिज्ञापत्र अपंगत्व हक्क कायदा, 2016 अंतर्गत सादर केले गेले आणि परिणामी तिच्या नियुक्तीला पुढे जाण्यास मंजुरी देण्यात आली. यासंबधीचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT