who is Padmakar Valvi- esakal
महाराष्ट्र बातम्या

Padmakar Valvi: किडनॅप झालेले पद्माकर वळवी पुन्हा काँग्रेसमध्ये आले अन् राणेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली

Padmakar Valvi: साल २००२...महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं युती सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. यापूर्वी १९९९ पर्यंत शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं अन् नारायण राणे मुख्यमंत्री होते. पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राणेंनी तगडा प्लॅन आखला...

Sandip Kapde

Padmakar Valvi:

साल २००२...महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं युती सरकार होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. यापूर्वी १९९९ पर्यंत शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं अन् नारायण राणे मुख्यमंत्री होते. पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राणेंनी तगडा प्लॅन आखला...त्यांना साथ होती बाळा नांदगावकर यांची... राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही आमदारांना त्यांनी मुंबईतील जोगेश्वरीमधल्या मातोश्री स्पोर्ट क्लबमध्ये डांबून ठेवलं...अन् राज्यात खळबळ माजली...यात होते आता भाजपमध्ये आलेले पद्माकर वळवी... ज्यांच्यामुळे राणेंचा प्लॅन फसला...नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया...

तर २००२ चा हा किस्सा आहे. शेकापच्या ५ आमदारांनी देशमुख सरकारचा पाठींबा काढला. याला जबाबाद होते सुनिल तटकरे. तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराला हरवलं, असा समज शेकापचा होता. त्यामुळे तटकरेंना कॅबिनेटमध्ये घ्यायला त्यांचा विरोध होता. देशमुख सरकार अल्पमतात आलं आणि याच संधीचा फायदा घेतला तो शिवसेनेच्या दादाने...म्हणजे नारायणे राणे यांनी...

दिवस होता ५ जून २००२ अन् राणेंनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही आमदारांना आपल्याकडे ओढून घेत ५ जून २००२ ला मुंबईतील जोगेश्वरीमधल्या मातोश्री स्पोर्ट क्लबमध्ये ठेवलं. सर्व आमदार बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. मात्र बाहेर शिवसैनिकांचं तगडी सुरक्षा होती.

तेव्हाचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी विलासराव देशमुख यांना बहुमत सिद्ध करण्यसाठी १० दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेसचे काही आमदार फुटले तर सरकार पडेल असा प्लॅन नारायण राणेंचा होता.

मातोश्री स्पोर्ट क्लबच्या बाहेर रात्रंदिवस शिवसैनिकांचा जागता पहारा होता. साधा पक्षी सुद्धआ आत जाऊ शकत नव्हता.नारायण राणे, बाळा नांदगावकर यांचा दरारा होता. पत्रकारांना देखील क्लबच्या आजूबाजूला भटकण्याची अनुमती नव्हती....

यावेळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली की काँग्रेसच्या पठ्ठ्याने शिवसैनिकांची सुरक्षा भेदली. काँग्रेसचे आमदार असलेलेल पद्माकर वळवी यांनी क्लबमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला अन् एका रिक्षात जाऊन बसले...मात्र शिवसैनिकांनी त्या रिक्षाला गराडा घातला अन् पद्माकर यांना पुन्हा क्लबमध्ये आणलं.

मात्र पद्माकर यांची बातमी राज्यभर पसरली होती. त्यामुळे आमदारांना सोडवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे ठरले. गृहमंत्री छगन भुजबळ यांनी रात्री कारवाईचे आदेश दिले. क्राईम ब्रांचचे डिसीपी २ एन्काउंटर स्पेशलिस्ट अन् १०० पोलीस असा ताफ मोतोश्री स्पोर्ट क्लबवर पोहचला. यावेळी राष्ट्रवादीचे काही आमदार देखील होते.

रात्रीची वेळी होती. अपहरण झालेले झोपण्याचा प्रयत्न करत होते. तर नारायण राणे गाड झोपेत होते. गेटवर पोलिसांचा फौजफाटा आला म्हटल्यावर राणे जागे झाले. त्यांनी गेटवर येऊन  शिवीगाळ करायला सुरुवात केली, पोलिसांना अन् अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या. त्यामुळे पोलिसही हादरले कारण राणे माजी मुख्यमंत्री अन् शिवसेनेते मोठे नेते होते. उद्या राणे परत मुख्यमंत्रीव झाले तर आपला गेम होणार, अशी भीती अधिकाऱ्यांना वाटली असेल.

नंतर  सुरु झालं राजकीय नाट्य नारायण राणे यांनी पत्रकार परिषद बोलावली, सर्व आमदारांनी आपण आपल्या मर्जीने स्पोर्ट क्लबमध्ये राहत असल्याचे सांगितले. तसेच सरकरावर नाराज असल्यामुळे आपण नारायण राणे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे गोपीनाथ मुंडे देखील उपस्थित होते. पळून जाण्याचा प्रयत्न केलेले पद्माकर वळवी देखील होते.

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विलासराव देशमुख यांना १३ जून २००२ ही तारीख दिली. शिवसैनिकांचा पहाऱ्यात सर्व आमदारांना घेऊन विधानभवनात गेले. यावेळी टॉयलेटला जाण्याचा बहाना करत पद्माकर वळवी पुन्हा पळाले. ते थेट विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या कक्षात गेले पण ते आपल्या कक्षात नव्हतेच....

पळून पळून घाम आलेले पद्माकर विधानसभा अध्यक्षांना शोधत होते. यावेळी त्यांना विधानसभा अध्यक्ष समिती कक्षात असल्याचे समजले. ते तिथे पोहचले आणि अरुण गुजराती यांना संपूर्ण हकीकत सांगितली. आपल्या जिवाला धोका असल्याचे देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे पद्माकर वळवी यांना मार्शल सुरक्षा देण्यात आली.

पुढे विश्वास प्रस्ताव येण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी सात आमदारांना अयोग्य घोषित केलं. पाच आमदार राष्ट्रवादीचे, १ जनता दल सेक्युलरचा  तर एक अपक्ष होता. त्यामुळे विधानसभेच्या जागा कमी झाल्या. २८८ ऐवजी २८१ झाल्या. शेकापच्या ५ आमदारांनी मतदानात भाग घेतला नाही. बहुमताचा आकडा झाला १३८,  विलारास देशमुखांनी विश्वासदर्शक ठरवा जिंकला. त्यांना १४३ मते मिळाली.

हे झाल्यानंतर विधानसभेच्या बाहेर राडा झाला. राष्ट्रवादी अन् शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. दगडफेक झाली, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला...अशाप्रकारे राणे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT