Maratha Reservation In Maharashtra
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि रमेश केरे पाटील यांची वेगवेगळी आंदोलने सुरु आहेत. केरे पाटील यांच्या आंदोलनाबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. या दोघांच्या आंदोलनांच्या उद्देशांमध्ये काही साम्य असले तरीही, त्यांच्या मार्गदर्शनाच्या पद्धती आणि राजकीय संबंधांमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या दोन्ही आंदोलनांमुळे मराठा समाजात फूट पडली का? असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाला. दोन्ही आंदोलकांच्या वेगवेगळ्या पद्धती आणि उद्देशांमुळे समाजात काही प्रमाणात फूट पडण्याची शक्यता आहे. परंतु, मराठा समाजातील लोकांची एकजूट आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची क्षमता कायम असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
रमेश केरे पाटील भाजपचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. मंत्रालयासमोर ते विखेंचे बॅनर लावत असतात कधी बघा, असे दानवे म्हणाले होते. परळीतून आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या केरे पाटील यांनी संभाजीनगर आणि मुंबईमध्ये देखील अनेक आंदोलने केली आहेत.
चर्चगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये विषप्राशन केल्याची घटना घडल्यावर, त्यांच्या नावाचा उल्लेख केलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे त्यांनी फेसबूक लाईव्हद्वारे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर जेजे रुग्णालयात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केरे पाटलांची भेट घेतली होती.
रमेश केरे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी केरे पाटील यांनी कोणी पाठवलं, असा प्रश्न शरद पवार यांनी पत्राकारांनी विचारला पण त्यांनी यावर बोलणे टाळले.
तर उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना प्रवीण दरेकरांची फूस असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. केरे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर देखील आंदोलन केले होते. त्यानंतर फडणवीसांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्याच्या माध्यमातून ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण आणि सगे-सोयरे अंमलबजावणी यासाठी ते ठाम आहेत. ते राज्यभर शांतता रॅली काढत आहेत आणि विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, रमेश केरे पाटील हे सर्व राजकीय नेत्यांना लक्ष करत आहेत. ओबीसीतून मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी त्यांची मागणी आहे. रमेश केरे पाटील यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केरे पाटील यांच आंदोलन आमचे आंदोलन नाही, असे स्पष्ट केले आहे. तर केरे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी असल्याचे स्पष्ट केले. तथापि, जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे की केरे पाटलांचे आंदोलन कुणाच्या सांगण्यावरून झाले आहे. फडणवीसांनी मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडले असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.