road accidents News sakal
महाराष्ट्र बातम्या

Road Accidents: अपघाती मृत्यूची जबाबदारी कोणाची? सव्वावर्षात ८९० मृत्यू; अपघात राखणारी यंत्रणा दंड वसुलीत; रस्ता सुरक्षा समित्या कागदावर

Latest Marathi News: वाहन चालकांचा बेशिस्तपणा आणि रस्त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे रस्ते अपघात वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ या काळात सोलापूर जिल्ह्यात ८९० जणांचा (शहर ९९, ग्रामीणमधील ७९१) मृत्यू झाला आहे.

तात्या लांडगे

Solapur News : महामार्गांच्या कनेक्टिव्हीटीमुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितपणे चालना मिळाली. पण, वाहन चालकांचा बेशिस्तपणा, आणि रस्त्यांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे रस्ते अपघात वाढले आहेत.

तरीदेखील अपघात रोखण्यापेक्षाही नुसता दंड वसुलीवरच पोलिस व आरटीओ विभागाचा भर आहे. धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२३ या १५ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील अपघातांमध्ये ८९० जणांचा (शहरातील ९९, ग्रामीणमधील ७९१) मृत्यू झाला आहे.

रस्त्यांवरील खड्डे वेळेत बुजवले जावेत, सोलापूर-पुणे, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजयपूर, सोलापूर-मंगळवेढा, अशा महामार्गांवर संरक्षित जाळी बसवावी, गरजेच्या ठिकाणी वीजेचे खांब बसवणे व अपघातप्रवण क्षेत्रात विशेषतः: वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, तुटलेली जाळी तत्काळ दुरुस्त करणे, महामार्गांवर थांबलेली वाहने लगेचच तेथून बाजूला करणे, अशी कामे तातडीने करणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

मात्र, सध्याची वस्तुस्थिती वेगळीच आहे. वाढत्या अपघाताला निश्चितपणे बेशिस्त वाहन चालक तेवढेच जबाबदार आहेत, पण अनेक अपघातांमध्ये निरापराधांनाही जीव गमवावा लागला आहे. त्यात नवविवाहितेचा पती, चिमुकल्यांचा वडील, वयस्क आई-वडिलांचा आधार हिरावला.

पण, महामार्गाची देखभाल करण्यासाठी ‘एनएचआय’, ब्लॅकस्पॉटवर उपाययोजनांसाठी ‘पीडब्ल्यूडी’, बेशिस्तांवरील कारवाईसाठी आरटीओ, स्थानिक पोलिस, ग्रामीण व शहर वाहतूक शाखेचे पोलिस आणि त्या सर्वांच्या कामांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व खासदारांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समिती कार्यरत असतानाही अपघात वाढतातच कसे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Marathi Tajya Batmya)

आता अपघात कमी करण्यावर सर्वाधिक भर

जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सर्वाधिक अपघात होणाऱ्या ठिकाणी ठोस उपाययोजना केल्या जातील. इंटरसेफ्टर वाहनांचे मार्ग निश्चित करणे, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवून बेशिस्तांवर अधिकाधिक कारवाया केल्या जातील. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंदर्भातील फलक कमी असून ते वाढविण्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

‘एनएचआय’ अन्‌ ‘पीडब्ल्यूडी’ काय करतंय?

महामार्गांवरील वाहनांकडून टोल वसूल करणारी यंत्रणा असो वा रस्त्यांची देखभाल करणारा ‘एनएचआय’ विभाग असो, यांना अपघातानंतर तुटलेली लोखंडी जाळी वेळेवर दुरुस्तीसाठी वेळ नाही. महामार्गांवर वाहतूक सुरक्षेसंबंधीचे पुरेसे फलक दिसत नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यांवर थांबलेली वाहने काही दिवस तेथेच दिसतात.

कोंडीजवळील पुलाजवळ मागच्या वर्षी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात होऊन सहा-सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तेथे वीजेचे खांब बसविण्याची मागणी झाली, पण त्याकडेही गांभीर्याने पाहिले नाही.

मात्र, काही अधिकारी सण-उत्सव काळात आपल्या चुका झाकल्या जाव्यात म्हणून आवर्जून वरिष्ठ अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून त्यांच्या कार्यालयात जातात, अशी चर्चा आहे. दुसरीकडे ब्लॅकस्पॉटवर (अपघातप्रवण ठिकाणे) काही दुरुस्तीची गरज असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काहीच कार्यवाही वेळेवर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT