एकनाथ शिंदेंच्या बंडामागे ईडी हेच मोठं कारण आहे, एकनाथ शिंदेंचा निकटवर्तीय जोशी यांना ईडीची नोटीस आली होती, अशी कमेंट अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर केलीये. धर्मवीर चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सचिन जोशीचं कनेक्शन असल्याचं समोर येतंय. एकनाथ शिंदेंचे अर्थव्यवहार असो किंवा माध्यमांना हँडल करणारे हे सचिन जोशी नेमके कोण आहेत यांची चर्चा सुरूये.
सचिन जोशी नेमके कोण?
सचिन जोशी हे मूळचे ठाण्याचेच असून ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालंय. सचिन जोशी हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात कसे आले, हे समोर आलेले नाही. एकनाथ शिंदेचे छोटे आर्थिक व्यवहार हे सचिन जोशी हाताळतात असल्याची चर्चा असली तरी याबाबत उघडपणे कोणीही भाष्य करत नाही. सचिन जोशी आणि ठाण्यातील एक मोठा बांधकाम व्यावसायिक हे अर्थव्यवहार हँडल करतात, असं सांगितलं जाते. (who is sachin joshi eknath shinde)
किरण माने काय म्हणतात?
सचिन जोशी कोण असे विचारले असता किरण माने म्हणतात, मी सचिन जोशींना ओळखत नाही. पण सोशल मीडियावर मी सचिन जोशींबाबत बातमी वाचली होती. यात सचिन जोशी हे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय असून तेच आर्थिक व्यवहार बघतात असा उल्लेख होता. सचिन जोशींना १० दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आल्याचे मला त्या बातमीतूनच समजले.
किरण माने यांनी पाठवलेल्या बातमीची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता गुगल सर्चमध्ये अशा आशयाची बातमी दिसली नाही. याबाबत कुठेही बातमी आली नाही किंवा ईडीकडूनही दुजोरा मिळालेला नाही, असं ठाण्यातील एका पत्रकाराने सांगितले.(shiv sena thane maharashtra political crisis)
सचिन जोशी कुठे आहेत?
सचिन जोशी हे धर्मवीर प्रदर्शित झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ असल्याची बातमी मराठी वृत्तपत्राने दिलीये. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडापूर्वी सचिन जोशी हे किमान ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते, असे सूत्रांनी सांगितले. धर्मवीर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सचिन जोशी हे सध्या आसाममध्ये एकनाथ शिंदेंसोबत आहे. ते भूमिगत झालेले नाही. सचिन जोशी यांना ईडीची नोटीसही आलेली नाही.
सचिन जोशींचा वाढता प्रभाव
एकनाथ शिंदे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख असताना सचिन जोशी हे ठाण्यातील माध्यम प्रतिनिधींच्या संपर्कात असत. शिंदे मंत्रिपदी विराजमान झाल्यावर सचिन जोशी यांचे मंत्रालयातील वजन वाढले. सरकारी बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती वाढली होती, असं समजते. धर्मवीर चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सचिन जोशींची कनेक्शन असून प्रमोशनमध्येही ते सक्रीय होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.