BJP party without ethics nana patole Dhananjay Munde Renuka Devi politics sakal media
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole: राज्यातील नऊ दंगलींचा सूत्रधार कोण? नाना पटोलेंचा संतप्त सवाल

सर्वकाही व्यवस्थित असताना अचानकपणे दंगली घडल्याच कशा?

सकाळ डिजिटल टीम

राज्यात औरंगाबाद, नगर, अकोला, त्र्यंबकेश्वर (नाशिक) व इतर अशा नऊ ठिकाणी काही दिवसांत जातीय दंगली घडल्या आहेत. सर्वकाही व्यवस्थित असताना अचानकपणे दंगली घडल्याच कशा?, त्यामागे नेमका सूत्रधार कोण आहे?, पोलिस दबावाखाली काम का करीत आहेत?, असे अनेक प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे सरकारला विचारले.

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी (ता. २१) हुतात्मा स्मृती मंदिर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी भाजपवर टीका केली.

याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अस्लम शेख, नसिम खान, आमदार भाई जगताप, प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुलवार, रामहरी रूपनवर, विश्वनाथ चाकोते, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी वाढल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच दंगली: चव्हाण

देशात नोटाबंदी करताना दोन हजाराची नोट असावी, अशी कोणाचीही मागणी नसतानाही त्या नोटा आणल्या. आता पुन्हा त्या बंद केल्या जात आहेत. पण, सुरवातीला त्या आणल्याच कशाला, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सरकारला विचारला.

तर अर्थव्यवस्था अजूनही भरकटलेलीच असून देशावरील कर्जाचा डोंगर खूपच वाढला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे म्हणूनच राज्यात दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप श्री. चव्हाण यांनी केला आहे.

शिंदे अन्‌ थोरात म्हणाले...

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही त्यावेळी जनता दलाने खूप त्रास दिला. पण, कर्नाटकातून त्या विजयी झाल्या आणि पुन्हा त्यांनी देशाचे नेतृत्व त्यांनी केले. आता कर्नाटक निकालानंतर भाजप गल्लीबोळात देखील दिसणार नाही, अशी जनभावना असल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

तर उत्तर प्रदेशात पैलवान मुली न्यायासाठी आंदोलन करीत आहेत, पण दुसरीकडे ब्रिजभूषणच्या समर्थनार्थ भाजप रॅली काढत आहे. आगामी १६ महिने निवडणुकीचे असून कर्नाटकप्रमाणे राज्यातील जनेतेने भाजपचा खोटारडा चेहरा ओळखायला हवा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT