Why did Bachchu Kadu revolt Why did Bachchu Kadu revolt
महाराष्ट्र बातम्या

राजकारणातील ‘अँग्री यंग मॅन’ बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत का गेले?

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत काही नेते गेले. या नेत्यांच्या यादीत अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. ते राजकारणात ‘अँग्री यंग मेन’ म्हणून ओळखले जातात. तसेच ते गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, अपंगांसाठी वाटेल ते करायला तयार असतात. अपंग आणि रुग्णांसाठी त्यांच्या संस्थेमार्फत मोठे काम चालते. यामुळेच त्यांना गरिबांचा व शेतकऱ्यांचा नेता म्हणूनही संबोधले जाते. चला तर जाणून घेऊया बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याबद्दल... (Why did Bachchu Kadu revolt)

बच्चू कडू (Bachchu Kadu) हे आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनासाठी ओळखले जातात. वेगवेगळे आंदोलन करून बच्चू कडू यांनी आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणे, विजेच्या खांबावर चढून विजेचे प्रश्‍न मांडणे, साप आंदोलन, चाबूक आंदोलन, अर्ध दफन आंदोलन करणे अशी त्यांच्या आंदोलनाची ओळख आहे. असे आंदोलन करूनच त्यांनी पहिल्यांदा लोकांचे व प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष...

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघ हा बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून आजवर चारवेळा निवडून आले आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने गरजूंना आजवर अनेकदा मदत केली आहे. त्यांची संघटना नेहमीच गरिबांच्या मदतीसाठी धावून येते. काही अधिकाऱ्यांना मारहाण करून, काम करण्याची ताकीद देऊन त्यांनी मतदार संघातील लोकांची सहानुभूतीही मिळविली होती. काही महिन्यांपूर्वी मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.

‘तमाशाबंदी’ची मोहीम राबवली

बच्चू कडू यांच्या मतदारसंघात अनेक तरुण हे व्यसनाकडे वळले होते. कडू यांनी गावच्या यात्रेच्या काळात ‘तमाशाबंदी’ची मोहीम राबवली होती. तमाशाच्या नादामुळे अनेक तरुण बहकले होते. ही बंदी लागू केल्यामुळे अनेक गावांत सामाजिक प्रबोधन झाले. राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होऊ लागल्या. कुस्ती व इतर क्रीडाप्रकारांना गावच्या यात्रेत प्रतिसाद मिळू लागला.

घेतला हजारो रुग्णांचा दुवा

बच्चू कडू यांनी अपंगांसाठी केलेल्या कामामुळे अनेकांना त्यांच्या आयुष्यात उभे होण्यास मदत झाली. त्यांची रुग्णसेवा तर अनेकांसाठी जीवदान ठरलेली आहे. गरीब रुग्णांवर मुंबई, नागपूर, पुणे अशा कोणत्याही शहरात मोफत उपचार होतील, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. हजारो रुग्णांचा दुवा त्यांनी घेतला आहे. मात्र, याचा गाजावाजा ते कधीही करीत नाही.

अशी झाली प्रहार संघटनेची स्थापना

अपक्ष आमदार बच्चू कडू हे सुरुवातीला शिवसेनेतच (shiv sena) होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मुद्यावरून त्यांचे पक्षाशी व नेत्यांशी काही जमले नाही. तसेच त्यांना सामाजिक कार्य, गरिबांची सेवा करायची होती. यातून त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ या संघटनेची स्थापना केली. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू असे त्यांचे नाव आहे.

एकनाथ शिंदेंसोबत का गेले?

बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत बच्चू कडू गेल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहे. ते शिवसेना सोडून शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत का गेले, हा प्रश्न चर्चेला जात आहे. मंत्रिमंडळात काम करताना बच्चू कडू यांचा अनेकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्क आला. तसेच शिंदे हे नेहमी मदतीसाठी धावून येत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांना भेटत नसल्याची चर्चा असताना शिंदे अपक्षांना वेळ देत होते, असे बोलले जात आहे. यामुळेच त्यांच्यावर विश्वास ठेवून ते शिंदेंसोबत गेल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT