राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलनही सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांसह जोरदार टीका केला. तसेच या सरकारनं जे कंत्राटी भरतीचा जीआर काढले ते रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. दरम्यान यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील लक्ष्य केलं आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या पापाचं ओझे आपल्या सरकारने का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पाप त्यांनी करायचं आणि आमच्या माथ्यावर फोडून त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य करायचं नाही.
याला अप्रूव्हलच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरूवात केली ते काँग्रेस आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला आहे.
युवकाची दिशाभूल, तसेच स्वतःचं पाप दुसऱ्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागीतली पाहिजे आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज जनतेत जाऊन उघडं करावं लागेल असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
तर कंत्राटी भरतीवरून शरद पवारांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार असं आधी करत नव्हते पण, अलिकडच्या काळात पक्ष फुटल्यापासून शरद पवार देखील असं करायला लागलेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सरकारच्या ३ वर्षाच्या काळात एकदाही भरती झाली नाही. दरवर्षी हजारो पेलिस निवृत्त होतात. त्यामुळे मोठा बॅकलॉग निर्माण झाला. आम्ही नियमीत पोलिस भरती सुरू केली. यावर्षी १८ हजार ३११ ची भरती आम्ही केली. ज्यामध्ये मुंबईला ७ हजार ७६ पोलिस शिपाई, ९९४ वाहन चालक दिले आहेत, यांची ट्रोनिंग पुर्ण होईपर्यंत ते कामाला लागेपर्यंत जवळजवळ दीड वर्षांचा कालवधी जातो अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली आहे.
कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील कंत्राटी भरतीवरुन सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यासाठी महाविकास आघाडीनं आंदोलनही सुरु केलं आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांसह हल्लाबोल केला. तसेच या सरकारनं जे कंत्राटी भरतीचा जीआर काढले ते रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.