वीज बिल  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

पावसाळ्यात लाईट का जाते? विजेच्या कडकडाटात इन्सूलेटर चिमणी फुटते आणि वीज वाहिन्या बंद पडतात; वीज गेल्यास ग्राहकांनी तक्रार ‘येथे’ करावी

वादळामुळे मोठ-मोठी जुनी झाडे अक्षरश: उन्मळून वीज वाहिन्यांवर पडतात आणि तारेमुळे दोन्ही बाजुचे पाच-दहा खांब जमीनदोस्त होतात. त्यात विजेचा कडकडाट असेल तर खांबावरील चिनी मातीची इन्सूलेटर (चिमणी) फुटतात आणि वीज वाहिन्या बंद पडतात, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : वीज कर्मचाऱ्यांसाठी मान्सून पूर्वीचा (अवकाळी) पाऊस युद्धाच्या प्रसंगापेक्षा कमी नसतो. दहा-पंधरा मिनिटाच्या वादळात होत्याचे नव्हते होवून जाते. वादळामुळे मोठ-मोठी जुनी झाडे अक्षरश: उन्मळून वीज वाहिन्यांवर पडतात आणि तारेमुळे दोन्ही बाजुचे पाच-दहा खांब जमीनदोस्त होतात. त्यात विजेचा कडकडाट असेल तर खांबावरील चिनी मातीची इन्सूलेटर (चिमणी) फुटतात आणि वीज वाहिन्या बंद पडतात, असे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

वीजयंत्रणा अशी आहे, ती चालू- बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय त्यात जीवाची जोखीम असते. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळाने येते, त्यासाठी ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांची मेहनत असते. जीवाची तमा न बाळगता भर पावसात, गडद अंधारात निर्जन ठिकाणी खांबावर चढून कर्मचारी काम करत असतो. विविध स्त्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यांत तयार केलेली वीज ग्राहकांच्या दारात आणण्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. हा सर्व पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर तत्काळ परिणाम होवून त्यात बिघाड होतो. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे ही यंत्रणा ठप्प होते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो व यंत्रणा बंद पडते, असेही ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

इन्सूलेटर चिमणी फुटते म्हणजे काय?

वीज खांबात वीज पुरवठा उतरू नये म्हणून चॉकलेटी रंगाचे चिनीमातीचे इन्सुलेटर (चिमणी) खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात. त्या तड्यामुळे वीजप्रवाह खांबात व खांबातून जमिनीत उतरतो अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होवून फिडर (वीज वाहिनी) बंद पडतो. फिडर बंद पडला नाही तर जिवित अथवा वित्त हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते.

ग्राहकांनी तक्रार कोठे व कशी करावी...

ग्राहकांनी मोबाईलच्या प्लेस्टोअर, विंडोज स्टोअर व ॲपस्टोअरहून ‘महावितरण’चे ॲप डाऊनलोड करावा. त्यात तक्रार नोंदीची सुविधा आहेत. तसेच मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळाचा वापर केल्यास उजव्या कोपऱ्यात ऊर्जा चॅटबॉटचे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित चिन्ह दिसेल. त्याठिकाणी आपला मोबाईल किंवा ग्राहक क्रमांक नोंदवून तक्रार नोंदवता येईल. वीज संबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची २४ तास सोय आहे. याशिवाय नोंदणीकृत मोबाईलवरुन ०२२-५०८९७१०० यावर साधा मिस कॉल केल्यास वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाईल. याशिवाय NOPOWER <ग्राहक क्र> हा संदेश ९९३०३९९३०३ या नंबरवर पाठवा, असेही ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

ग्राहकांनी कोणती दक्षता घ्यावी

  • १) ग्राहकांनी घरात ELCB किंवा RCCB (Residual Current Circuit Breaker) जरूरी आहे. घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास वीजपुरवठा बंद होऊन जिवितहानी टाळता येईल.

  • २) अर्थिंग सुस्थितीत असावी व गरजेनुसार त्याची तपासणी करावी. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

  • ३) वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी. खांबाला किंवा ताणाला जनावरे बांधू नयेत, विद्युत खांबाखाली घर, गोठे, कडब्याची गंजी उभारु नयेत.

  • ५) बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास ग्राहकांनी संपर्क केल्यास तातडीने दुरूस्ती होऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल.

  • ६) विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये व त्याची माहिती तातडीने वीज कंपनीला द्यावी. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप, स्टार्टर, वीजमिटरबाबत विशेष दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT