महाराष्ट्र बातम्या

रेग्युलर कॉलपेक्षा ‘WhatsAPP Call’ला सर्वाधिक पसंती का? ‘या’ बाबींसाठी व्हॉट्‌सॲप कॉल वाटतो सर्वांनाच सुरक्षित

कॉल रेकॉर्डिंग होत नाही, लोकेशन ट्रेस होत नाही, संबंधित व्यक्तीच्या ‘सीडीआर’मध्ये रेकॉर्ड येत नाही, अशा व्हॉट्‌सॲप कॉलवरूनच संपर्क वाढला आहे. सावज जाळ्यात पकडण्यासाठी सायबर गुन्हेगारांचीही याच कॉलला पसंती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कॉल रेकॉर्डिंग होत नाही, लोकेशन ट्रेस होत नाही, संबंधित व्यक्तीच्या ‘सीडीआर’मध्ये रेकॉर्ड येत नाही, अशा व्हॉट्‌सॲप कॉलवरूनच संपर्क वाढला आहे. सावज जाळ्यात पकडण्यासाठी सायबर गुन्हेगारांचीही याच कॉलला पसंती आहे. दुसरीकडे खासगी, सरकारी अधिकारी- कर्मचारी देखील समोरच्याला व्हॉट्‌सॲपवरूनच कॉल करतात, अशी सद्य:स्थिती आहे.

व्हॉट्‌सॲप कॉलवरून एखादा गुन्हा घडल्यास त्या संबंधीची माहिती मोबाईल कंपनीकडून देखील पोलिसांना उपलब्ध होत नाही. सायबर गुन्हेगारांकडून आता समोरील व्यक्तीला फसविण्यासाठी असे कॉल केले जात आहेत. या कॉलवरून कितीही वेळ समोरील व्यक्तीला बोलता येते. ग्रुप कॉलद्वारे अनेकांशी एकाचवेळी बोलता येते. या उलट व्हिडिओ कॉलवरून बोलताना पुरावा म्हणून स्क्रीन शॉट काढता येतो, पण व्हॉइस कॉल असल्याने व्हॉट्‌सॲप कॉलचे रेकॉर्ड ठेवता येत नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगार अनेकदा समोरील व्यक्तीला सुरवातीला व्हॉट्‌सॲप व्हॉइस कॉलवर बोलून व्हिडिओ कॉल करायला सांगतात. त्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केल्यावर त्याचे स्क्रीन शॉट काढून ब्लॅकमेल केले जाते. नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या अशा कॉलपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

‘एव्हरीवन डिलिट’ मेसेज राहतात

मोबाईलवर चॅटिंग करताना अनेकजण एकमेकांना मेसेज करतात. एखादा मेसेज चुकून किंवा मुद्दामहून पाठविला असल्यास तो डिलिट केला जातो. त्यातही ‘डिलिट’ व ‘एव्हरीवन डिलिट’ असे पर्याय असतात. अनेकजण ‘एव्हरीवन डिलिट’ करतात, पण तो मेसेज जरी समोरील व्यक्तीला दिसत नसला, तरी त्याचे रेकॉर्ड संबंधित मोबाईल कंपन्यांकडे असते. अनेक गुन्ह्यांत पोलिस कंपनीकडून ते चॅटिंग मागवून तपासात मदत घेतात.

अधिकारी का करतात व्हॉट्‌सॲप कॉल?

सरकारी कार्यालयांमध्ये शासनाच्या वतीने लँडलाइन फोन उपलब्ध करून दिलेले आहेत. पण, सर्रासपणे अधिकारी- कर्मचारी मोबाईलवरील व्हॉट्‌सॲप कॉलवरूनच समोरील व्यक्तींसोबत बोलतात. या कॉलचे थेट रेकॉर्डिंग करता येत नाही. खासगीतील बोलणी किंवा पैशांच्या देवाण- घेवाणीसाठी अनेकजण असे कॉल करतात, ही वस्तुस्थिती आहे. या कॉलचे लोकेशन स्पष्ट होत नाही. गुन्हा घडल्यास त्या व्यक्तीच्या ‘सीडीआर’मध्ये (कॉल डिटेल्स रिपोर्ट) देखील याचे रेकॉर्ड येत नाही. त्यामुळे नियमित कॉलपेक्षा व्हॉट्‌सॲप कॉल अधिकारी- कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटतात.

नागरिकांनी सावध राहावे

सायबर गुन्हेगारांकडून समोरील व्यक्तीला फसविण्यासाठी व्हॉट्‌सॲप कॉलचा वापर केला जात आहे. दुसरीकडे, अश्‍लील व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. त्यामुळे नागरिकांनी अशा कॉलपासून सावध राहावे.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस, सोलापूर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT