अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अंदाजे 35 आमदार आपल्या सोबत घेतले. त्यामुळे अर्थात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. सध्या शरद पवारांकडे 18- 19 आमदार आहेत. पण आता शरद पवारांचा उरलेला गटही सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु जोर धरतेय. आणि यामध्ये मुख्य नाव आहे ते जयंत पाटलांच.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २ दिवस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी जयंत पाटील हे अमित शाहांना भेटल्याच्या चर्चा सुरु झाल्या. एवढचं नाही. १५ ऑगस्टनंतर जयंत पाटील हे अजित पवारांच्या गटात येणार असल्याचही बोललं गेलं. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. पण जयंत पाटलांनी स्वत: माध्यमांसमोर येत या चर्चांवर पडदा टाकत आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडत. भाजपसोबत आणि खास करून अजित पवारांसोबत जाणं हे तितकंस सोपं नाही आणि यामागे ४ महत्वाची कारण आहेत.
जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाणं तितकं सोपं नसणार हे त्यांच पहिल कारण म्हणजे
1 ) दूय्यम वागणूक
अजित पवारांच्या बंडाआधीच राष्ट्रवादीत दोन गट असल्याच्या चर्चा होत्या. एक म्हणजे अजित पवार आणि दूसरा शरद पवार गट. आणि जयंत पाटील हे शरद पवार गटाचे शिलेदार. ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून नेहमी जयंत पाटील यांना दूय्यम वागणूक दिल्याचं बोलले जातं.
अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा दादांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या शरद पवारांच्या जवळ असणाऱ्या नेत्यांना दोष दिला.
एवढचं नाही तर बंडावेळी अजितदादांनी सगळ्या आमदारांना कॉल केला पण जयंतरावांना नाही असं ही बोललं जातं, त्यामुळे जर जयंत पाटील हे अजित पवारांच्या गटात गेले तर मंत्रीपदाशिवाय फार काही मिळणार नाही, आणि अजितदादांच्या हाताखाली काम करणं जयंत पाटलांना काही जमणार नाही आणि त्यांच्या कार्यकर्तांना पटणारही नाही.
२) सहानुभीची लाट
अजित पवारांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट फोडला असला तरी सहानुभीची लाट ही शरद पवारांच्या बाजूने आहे. याचा प्रत्यय शरद पवारांच्या येवल्याच्या सभेतून दिसून आला. एवढचं नाही तर काही दिवसांपुर्वी सकाळ माध्यम समुहामार्फत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मतदारांची सहानुभुती ही शरद पवारांच्या बाजूने पहायला मिळत आहे.
शरद पवारांच्या सहानुभीची लाटेचा फायदा हा जयंत पाटलांना सुद्धा होणार आहे. कारण शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी भावूक झालेले जयंत पाटील सगळ्यांना चांगलेच भावले होते आणि आताही बंडाच्या वेळी जयंत पाटलांना मिळणारी सहानुभूती देखील सगळ्यांनी पाहिली आहे. त्यामुळे भाजपसोबत किंवा अजितदादांसोबत जाऊन जयंतराव शरद पवारांचा विश्वास आणि सहानुभीची लाटेचा फायदा कधीच सोडणार नाही.
३) प्रदेशाध्यक्षपद
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद हेच अजितदादांच्या बंडाचे ठोस कारण मानले जाते. कारण गेल्या ५ वर्षांपासुन प्रदेशाध्यक्ष पद हे जयंत पाटलांकडे आहे. जे ३ वर्षांनी बदलत असतं. मात्र जयंत पाटलांच्या बाबतीत हे घडलं नव्हत. त्यामुळे अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही गोष्ट सगळ्यांसमोर आणून दिली आपली प्रदेशाध्यक्ष पदाची इच्छा बोलून दाखवली. अजितदादांनी अल्टिमेटम सुद्धा दिला, जो शरद पवारांनी पाळला नाही आणि त्यानंतर लगेच अजितदादांनी सत्तेचा मार्ग निवडला. त्यामुळे अजित पवार विरूध्द जयंत पाटील या वादात पाटलांकडे असणार प्रदेशाध्यक्ष पद हे मुळ आहे.
४) मुख्यमंत्रीपद
अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा अख्ख्या महाराष्ट्राला माहितेय. त्यांनी याआधी कित्येकदा जाहीरपणे आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलुनही दाखवली. पण यातचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाट लांचे नावही मुख्यमंत्रीपदासाठी घेतलं जातं आणि आता अजित पवारांनी वेगळी चुल मांडल्याने भविष्यात महायुतीतीच सरकार पुन्हा आलं तर रेसमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना हरवून मुख्यमंत्रीपद दादांना मिळवावं लागणार आहे .
पण राजकारणात काहीही होऊ शकतं आणि सकाळ माध्यम समुहाने केलेल्या सर्व्हेनुसार जर जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेला तर जयंत पाटलांनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळही पडु शकते. त्यामुळे हा चान्स जयंत पाटील घालवणार नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाण्याची रिस्क घेणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.