Madina  E sakal
महाराष्ट्र बातम्या

अजान का म्हंटली जाते? लाऊडस्पीकरची काय गरज?

हलिमाबी कुरेशी

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरुय, मशिदीवरील लाऊडस्पीकर विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिलाय. यावरुन सध्या सामाजिक तणावाची स्थिती निर्माण झालीय. या लेखात अजान का दिली जाते याबद्दल माहीती जाणून घेऊयात.

अजान म्हणजे काय?

अजान म्हणजे नमाजची वेळ झालीय, नमाजसाठी चला हे सांगण्यासाठीचा कॉल, बुलावा असतो. इस्लाममध्ये नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवसभरात ५ वेळा नमाजपठण कर्तव्य मानलं जातं.जास्तीत जास्त लोकांपर्यंत नमाजच्या वेळेची माहीती पोहोचावी यासाठी अजान दिली जाते.

अजान देण्याची सुरुवात कशी झाली-

इस्लाम धर्माचा उद्य झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मदीन्यात नमाजसाठी लोक येत, तेव्हा मात्र वेळ लक्षात येत नसे. अनेकांनी ही समस्या सांगितल्यानंतर, या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी चर्चसारखी घंटा वाजवण्यात यावी असा सल्ला दिला होता, तर काहींनी एखादं निशाण वर केलं जावं असा सल्ला दिला. पण हजरत उमर यांनी अजान दिली जावी असा सल्ला दिला. या प्रसंगाचा उल्लेख 'हदीस' मध्ये (बुखारी) ५७८ मध्ये आढळतो.

मुस्लिम एकेश्वर मानतात. या अजानमध्ये तुम्ही नमाजसाठी चला, नमाजची वेळ झालीय हे सांगितले जातं. अजान मुआज्जीन देतात, मुआज्जीन पाच वेळा अजान देणारी व्यक्ती असते. भोंगे नव्हते त्या काळात अजाण देण्यासाठी उंच जागेवर जाऊन अजान मोठ्याने दिली जायची. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजान पोहोचावी. पण लाऊडस्पीकर आल्यानंतर मात्र उंच जागेवर जाऊन अजान देणं हळूहळू बंद झालं. भारतात साधारणत: १९२० च्या दरम्यान आजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर सुरु झालाय. अजानमध्ये प्रेषित पैंगबरांची स्तुती आणि नमाजसाठी या असं म्हंटलं जातं. अजान अरेबिक भाषेत दिल्ली जाते. अजान साधारणत: २ ते २.५ मिनिटांची असते. पुण्याचे जमाते इस्लामीचे करिमुद्दीन शेख यांनी ही माहीती दिलीय.

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार लाऊडस्पीकर वापरले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी सकाळ ऑनलाईनशी बोलताना व्यक्त केलीय.तसेच जमाते इस्लामीकडून 5 वर्षांपासून मस्जिद परिचय हा उपक्रम राबविला जातोय. यात अजान, नमाज आणि मशिदीतील उपक्रमांविषयी माहीती दिली जात असल्याचं त्यांनी सांगितली.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय-

18 जुलै 2005 मध्ये लाऊडस्पीकर संदर्भात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालपत्रात नागरिकांच्या अधिकारांविषयी बोलताना जबरदस्तीने कुठल्याही प्रकारचा गोंगाट, आवाज लादला जावू नये याला महत्व दिलंय. कुठल्याही धर्म आणि धार्मिक परंपरांचा नाही, तर नागरिकाच्या शांततेत जगण्याच्या आधिकाराचा विचार निकालपत्रात मांडण्यात आलाय. गोंगाटापासून मुक्तता हा जगण्याच्या मुलभूत अधिकार आहे. भारतीय घटनेच्या कलम २१ चा आधार घेत न्यायलयाने मूलभूत अधिकारांतर्गत हा निकाल दिलाय. त्यामुळे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देण्यात आलीय.

सण-उत्सवांच्या काळात जास्तीत जास्त १५ दिवस नियम शिथिल करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत परनावगी गरजेची आहे. रात्री १० नंतर केवळ एखाद्या बंद हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमातील वापर, ज्यात शेजाऱ्यांनाही त्रास होणार नाही, असा वापर करण्याला परवानगी दिली. उदा. बंद हॉलमधील कार्यक्रम, ऑडीटोरियम, कॉन्फरन्समधला वापर. तसेच आपातकालीन परिस्थितीत लाउडस्पीकरचा वापर कधीही करता येईन, असही न्यायालयाच्या निकालपत्रात म्हंटलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT