Why the need of treason clause sharad pawar mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

देशद्रोहाच्या कलमाची गरज काय? - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारविरोधात टीका करणाऱ्यांवर सर्रासपणे लावण्यात येणाऱ्या देशद्रोहाच्या भादंवि कलम १२४ (अ) चा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. राजद्रोहाबाबतचे हे कलम सन १८७० सालचे असून ब्रिटिशकालीन कलमाची सध्या खरंच गरज आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे प्रतिज्ञापत्रात उपस्थित केला.

देशाच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी भारतीय दंड विधान आणि यूएपीए (दहशतवादी प्रतिबंधक कायदा) कायद्याच्या तरतुदी पुरेशा आहेत. त्यामुळे ब्रिटिशकालीन कलम १२४ (अ) चा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे पवार यांनी आयोगापुढे केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्या. जे. एन. पटेल यांच्या आयोगापुढे पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या घटनेबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षावर मला आरोप करायचा नाही. सामाजिक क्षेत्रातील आतापर्यंच्या अनुभव, क्षमता आणि ज्ञानाच्या आधारावर आयोगाला सहकार्य करण्याचा माझा उद्देश आहे, असेही पवार यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, आयोगाने पाच आणि सहा मे रोजी पवार यांना साक्ष देण्यासाठी समन्स बजावले आहे.

पवार काय म्हणाले?

सध्याचे कायदे आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी असलेली आवश्यकता याबाबत पवार यांनी प्रतिज्ञापत्रात प्रामुख्याने लक्ष वेधले आहे. भादंवि, यूएपीए, माहिती-तंत्रज्ञान कायदा, फौजदारी दंडसंहिता आदींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांनी दंगलसदृश परिस्थिती टाळण्यासाठी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करायला हवा, असेही पवार यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT