marriage  
महाराष्ट्र बातम्या

धक्कादायक! बायकोला अंधारात ठेवून चढला बोहल्यावर; पहिल्या पत्नीने मंडपातच केला राडा अन्...

रवींद्र देशमुख

Nagar News - कायद्यानुसार पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न करण्यास मान्यता नाही. मात्र नगरमध्ये एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्याच्या चांगलाच अंगलट आला असून पहिल्या पत्नीने मंडपातच राडा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लग्नघटीका जवळ येत असताना पहिल्या पत्नीने मंडपात एंट्री केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटस्फोट न देताच पती लग्न करत असल्याचं पाहून पहिली पत्नी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. पीडित महिला म्हणाली की, १२ वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं. लग्नानंतर मला त्रास देण्यात येत होता. अडीच वर्षापूर्वी मला घरातूनही हाकलून दिलं होतं. मला अचानक माहिती मिळाली, अहमदनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आपला पती लग्न करत आहे. त्यानंतर त्याला पकडून आम्ही पोलिसांत दिलं.

गुन्हा दाखल झाल्याप्रमाणे कारवाई व्हावी, तसेच जे माझ्यासोबत झालं, तसं कोणासोबत होऊ नये, असंही पीडितेने म्हटलं. पोलिसांनी सांगितलं की, विशाल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीप्रमाणे तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जे.सी. मुजावर यांनी सांगितलं.

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elcid Investments Share Price: जुलै महिन्यात ३ रुपयांना असलेल्या शेअरची किंमत २ लाख ३६ हजार; MRF चं रेकॉर्ड मोडलं

Sports Bulletin 29th October : न्यूझीलंडविरूद्धच्या वन-डे मालिकेत भारतीय महिला संघाची बाजी ते स्मृती माधनाचे विक्रमी शतक

INDW vs NZW: Smriti Mandhana चे विक्रमी शतक अन् भारताने सामन्यासह जिंकली मालिका

Rahul Gandhi: ''अदानींच्या एकाधिकारशाहीला सरकारचे संरक्षण'', राहुल गांधींचा गंभीर आरोप

Government Jobs: पेपरफुटीच्या कायद्यामुळे महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांवरचं विघ्न टळलं, एक लाख उमेदवारांची निर्विघ्न भरती

SCROLL FOR NEXT