NCP Ajit Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Beed Rally: बीडमध्ये अजित पवारांच्या उत्तर सभेबाबत संभ्रम! धनजंय मुंडेंनी केलं स्पष्ट

शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. तसेच धनजंय मुंडेवर टीकाही केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून त्यांनी अजित पवारांसह त्यांच्या गटात सामिल झालेल्या धनंजय मुंडे यांच्या टीका केली होती. त्याचबरोबर येत्या निवडणुकीत आपल्याला साथ देण्याबाबत बीडच्या जनतेला साद घातली होती.

शरद पवारांच्या या सभेला आता अजित पवार २७ ऑगस्ट रोजी वेगळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. पण ही सभा रद्द झाल्याची चर्चा सुरु होती, यावर धनजंय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Will Ajit Pawar rally be held in Beed or not Dhanjay Munde made it clear)

धनंजय मुंडेंनी केलं स्पष्ट

धनजंय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुंडे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड इथं 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत"

शरद पवारांचं शक्तीप्रदर्शन

दरम्यान, शरद पवारांनी बीडच्या सभेत अजित पवारांसह धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडीत यांच्यावर सडकून टीका केली होती. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना किमान विसरु तरी नये, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला होता. तत्पूर्वी मोठी कार रॅली काढत सभेच्या आयोजकांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT