Abdul Sattar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Abdul Sattar: 'जवानाचा भुखंड सत्तारांनी गिळला!', फडणवीस कारवाई करणार का?

जवानाचा भूखंड सत्तारांनी हडपल्याचा आरोप करणाऱ्या एका बातमीचा फोटो आणि कागदपत्रे देखील देखील नेत्याने शेअर केले

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासुन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. कृषी विभागाच्या कथित पथकाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीच्या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कृषिमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत आहेत. (Latest Marathi News)

याचदरम्यान कथित कृषी पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान या पथकात सहभागी असलेल्यांनी पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली आहे. या पथकात सत्तारांचा पीए दीपक गवळी याचा देखील समावेश होता. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही माहीती शेअर करत सत्तार यांनी मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानाचा भूखंड सत्तारांनी हडपल्याचा आरोप करणाऱ्या एका बातमीचा फोटो आणि कागदपत्रे देखील देखील त्यांनी शेअर केले आहेत.(Latest Marathi News)

त्यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये राऊत म्हणतात कि, "दे.भ. देवेंद्र जी हे खरे आहे?औरंगजेबाचा बंदोबस्त नंतर करू..आधी या औरंग्याच्या पेकाटात लाथ घाला.. भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची सुध्दा लूट सुरु आहे..काय करताय बोला" असं राऊत यांनी ट्वीट केलं आहे.(Latest Marathi News)

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या वृत्तपत्रात काय आहे?

'मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या लष्करी जवानाने रक्ताचे पाणी करून खरेदी केलेला अख्खा भूखंडच सत्तारांनी गिळल्याचे समोर आले आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मानवी हक्क आयोगाकडे खेट्या घालून कुणीही या जवानाला न्याय दिला नाही. लष्कराने जिल्हाधिकाऱ्यांना दखल देण्याची विनंती केली. पण सत्तारांची दहशतच अशी की, भी पोटी जिल्हाधिकाऱ्यांनी डोळे झाकून घेतले. अजव म्हणजे तालुक्याचे न्याय दंडाधिकारी असलेले तहसीलदार सत्तारांच्या भीतीपोटी बदली करून पळून गेले.'(Latest Marathi News)

'सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागे गट क्र. ९२ मध्ये २००७ मध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यात आली. समीर अहमद हा अब्दुल सत्तारांचा नातलग या सोसायटीचा कर्ताधर्मा आहे. सोसायटीत एकूण २०५ भूखंड असून, खरेदीदारांना रीतसर खरेदीखत करून सातबारावरही त्याची नोंद घेण्यात आली. कालांतराने अब्दुल सत्तार यांना मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. या मेडिकल कॉलेजला जागा मिळवण्यासाठी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या दोन मुलांनी सोसायटीतील प्लॉटधारकांचा अक्षरशः छळ मांडला.'(Latest Marathi News)

'निल्लोड येथील अप्पाराव गिरजाराम गोरडे यांचा या सोसायटीत ८५ क्रमांकाचा साधारण १३०० चौरस फुटांचा प्लॉट आहे. अप्पाराव यांचा मुलगा योगेश हा लष्करात जवान असून त्यानेच हा प्लॉट खरेदी केला. योगेश हा सध्या राजस्थानात जोधपूर येथे कर्तव्यावर आहे. हा प्लॉट बळकावण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी गोरडे कुटुंबावर प्रचंड दबाव आणला. गोरडे कुटुंबाची हरतऱ्हेने कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु गोरडे यांनी इतर प्लॉटधारकांप्रमाणे प्लॉटचे दानपत्र करून देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर सत्तारगँगने गोरडे यांच्या प्लॉटवर सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरून बेकायदा कब्जा केला.'(Latest Marathi News)

'धाकदपटशा दाखवून प्लॉटवर कब्जा नॅशनल सोसायटीच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभारण्याच्या वेडाने झपाटलेल्या अब्दुल सत्तार यांनी प्लॉटधारकांना हुसकावण्यासाठी सगळ्या नीती वापरल्या. ज्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्लॉटवर बुलडोझर चालवून दहशत निर्माण करण्यात आली. किरकोळ रकमा देऊन प्लॉटधारकांकडून दानपत्र लिहून घेतले. जवळपास दीडशे प्लॉट सत्तार यांनी बळकावल्याचे सोसायटीच्या सभासदांनी सांगितले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT