महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: अनेकांना माज आलायं, तो उतरविण्यासाठी मुंबईत जाणार; जरांगेंचा सरकारला इशारा

सकाळ वृत्तसेवा

KATRAZ : बईतल्या अनेकांना माज आला आहे. तो माज उतरविण्याचे औषध माराठ्यांजवळ आहे. त्यामुळे एकदा मुंबईत जायचे आहे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातले लई वळू माजलेत त्यांचा माज एकदा नक्की उतरवू.

असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कात्रजमध्ये शांतता रॅलीतील सभेत बोलताना राजकीय नेत्यांना दिला. समस्त कात्रज ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा कात्रज चौकात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

जरांगे म्हणाले, 'एक मुलगा म्हणून लढतोय. आज जास्त काही बोलणार नाही. मी मरणाच्या दरात उभा आहे. खोटं बोलणार नाही. मागे हटणार नाही. आपली लेकरं मोठी करायची आहेत. राजकीय पक्ष आणि नेते मोठे करायचे नाहीत. माझा समाज मोठा झाला पाहिजे हा माझा आट्टहास आहे. बरेचजण म्हणायचे मराठे एक नाहीत. पण, पुणे कात्रजकरांची पाठ थोपटली पाहिजे. मी बोलतो ते करून दाखविणार लई जणांना वाट दाखविणार! आरक्षण मिळेपर्यंत हटणार नाही आणि हतायचे नाही. सर्वजण अशीच एकजूट दाखवा.

---

----

-१:२५ मिनिटांनी कात्रजमध्ये आगमन

-जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण

-घोषणांनी परिसर दणाणला

-पोलिसांकडून चोख बंदोबस्त

-सातारा रस्त्यावरून येणारी अवजड वाहतुक नवले पुल मार्गे वळविण्यात आली.

-भिलारेवाडी आणि मांगडेवाडी समस्त ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजातर्फेही उत्स्फूर्त स्वागत

-गर्दीमुळे स्टेजवर पोहोचण्यास उशीर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT