किल्लेमच्छिंद्रगड : वाळवा तालुक्याच्या उत्तरेकडील भागातले शेतकरी शेतीस खत म्हणून साखर कारख्याकडील मळी मिश्रित पाण्याचा वापर वाढत्या प्रमाणत करू लागले आहेत, त्यामुळे जमिनीतील सुक्ष्म जैविक कणाचा (Soil micro-organisms) नाश होऊन मातीची राख आणि भूगर्भातील जलसाठा कायमस्वरूपी विषमय होण्याचा धोका तयार होऊ लागला आहे.
मळी मिश्रीत पाणी हा साखर कारखान्यात अल्कोहोल (Alcohol) निर्मितिवेळी निर्माण होणारा द्रवरूप कचरा. याच द्रवकुपी कचऱ्याचा शेतीसाठी शेणखत (Dung manure) परवडेना या त्राग्याने शेतकऱ्याकडून मोठया प्रमाणात खत म्हणून वापर होवू लागल्याने भविष्यात शेतीचे होणारे नुकसान तसेच पर्यावरणाचे होणारे प्रदूषण (Pollution) ही सर्वात मोठी गंभीर समस्या असणार आहे. साखर कारखान्याच्या मद्य निर्मिती प्रकल्पातून बाहेर पडणारे मळी मिश्रीत पाणी शेतीस दिल्याने सुरवातीस दोन पीके जोमदार येतात. पुढे हेच पाणी मृदेस निकामी आणि विहीरी, बोअरवेलमधील पाण्यास विषारी बनवते. भूजल जलस्रोत्रामधील दुषित पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्याने पोटाचे, आतड्याचे आणि स्नानासाठी वापर केल्याने त्वचेचे विकार जडतात. उपचार वेळेत झाले तर ठीक अन्यथा हे विकार पुढे कॅन्सरचे (Cancer) रूप धारण करतात.
सालदरसाल तालुक्याच्या उत्तर भागातील किल्लेमच्छिंद्रगडपासून कुंडलपर्यंतच्या डोंगराळ भागातील जिराईत शेतीसाठी तसेच नरसिंहपूर, भवानीनगर, बिचूद, येडेमच्छिंद्र, कोळे, शिरटे या गावातील बागायत शेतीसाठी शेतमशागत करताना मळी मिश्रीत पाणी दिले जाते. शेतात खत म्हणुन वापरलेल्या या पाण्याचा अर्क पावसाळ्यात विहीरी, बोअरवेलमध्ये झिरपून भुजलसाठा विषारी बनतो., भूजल साठ्यातील हेच दुषित पाणी पिण्यासाठी वापरल्याने मानवास गॅस्ट्रोची तर पशुधनात डायरेरियाची साथ उद्भवते. वेळेत उपचार झाले तर ठीक. अन्यथा गॅस्ट्रो मानवासाठी आणि डायरेरियाचा आजार पशुधनासाठी जिवघेणा ठरतो. याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Pollution Control Board) शेतीसाठी मळीमिश्रीत पाणी पुरवठा करणारे ठेकेदार, पुरवठादार यांना पाणी प्रदूषण प्रश्नी दोषी मानून कडक कारवाई करण्याची मागणी परीसरातून जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.