Eknath Shinde Devendra Fadnavis government sakal
महाराष्ट्र बातम्या

आमदार निधी देतील का? ‘सायकली’अभावी ७२४१ मुली शाळा सोडण्याच्या वाटेवर

जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या ७८४१ मुलींना दररोज दीड-दोन कि.मी. पायपीट करून शाळेत यावे लागते. त्या मुलींचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘सायकल बॅंक’ या उपक्रमातून सायकली देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बहुतेक आमदारांनी दमडीही दिलेली नाही, हे विशेष.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या सात हजार ८४१ मुलींना दररोज दीड-दोन किलोमीटरची पायपीट करून शाळेत यावे लागते. वयात आलेल्या मुलींच्या चिंतेने पालकांना येण्याजाण्याची सोय नसल्याने काही मुलींची शाळा बंद केली आहे. त्या मुलींचे शिक्षण बंद होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘सायकल बॅंक’ या उपक्रमातून सायकली देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी अनेकांना आवाहन केले पण, बहुतेक आमदारांनी त्यासाठी दमडीही दिलेली नाही, हे विशेष.

उद्योजक, आमदार, प्राध्यापक, अधिकारी, अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मुलांच्या तुलनेत हातावरील पोट असलेल्या मुला-मुलींना परिस्थिती खूपच गंभीर असल्याची बाब समोर आली आहे. उन्हाळा असो की पावसाळा, त्या गरीब कुटुंबातील मुलींना शाळेत जाण्यासाठी दूरवरून पायपीट करावी लागत आहे. शाळेला विलंब होईल म्हणून अनेकदा उपाशीपोटीच त्यांना शाळेत यावे लागते. दरम्यान, निमगाव (ता. माळशिरस) येथील जवळपास ४० मुली शाळेत ये-जा करण्याची सोय नसल्याने घरीच बसल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील १४ ते १८ वयोगटातील ज्या मुली दूरवरून पायपीट करून शाळेत येतात, त्याचा सर्व्हे केला. त्यावेळी जवळपास आठ हजार मुली समोर आल्या. त्यात माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील सर्वाधिक मुली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. स्वामी यांनी स्वत: त्यासाठी मोठी रक्कम दिली. आता प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व उपशिक्षणाधिकारी संजय जावीर हे प्रत्येकी २५ हजार रुपये देणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योजक, आमदार, खासदार, मुख्याध्यापक, शिक्षक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सायकलींची गरज असलेल्या मुली

तालुका मुली

माढा १,१४७

माळशिरस १,७४७

द.सोलापूर १,४७४

पंढरपूर १,४३६

सांगोला ९६७

करमाळा ३०८

अक्कलकोट १७६

मंगळवेढा ४०१

मोहोळ ५५

उ.सोलापूर ४५

बार्शी ८५

आमदारांना दरवर्षी पाच कोटींचा निधी

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात ११ आमदार असून एक विधानपरिषद व पदवीधर व शिक्षक आमदार दोन आहेत. जिल्ह्यात दोन खासदार आहेत. आमदारांना दरवर्षी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी तीन ते पाच कोटींचा निधी मिळतो. पण, तो निधी शिक्षण, आरोग्याच्या तुलनेत रस्त्यांच्या कामावर खर्च होतो, अशी स्थिती आहे. स्वत:च्या खिशातून नको, पण सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून तरी आमदारांनी त्या मुलींना सायकली घेऊन द्याव्यात, अशी पालकांची अपेक्षा आहे.

माळशिरस, द. सोलापूर, सांगोला, पंढरपूर-मंगळवेढ्यात सर्वाधिक मुली

काय झाडी, काय डोंगूर अन्‌ काय हाटील म्हणून देशभर प्रकाशझोतात आलेले आमदार शहाजी पाटील यांच्या मतदारसंघातील ९६७ मुलींकडे शाळेत यायला सायकली नाहीत. माळशिरस तालुक्यात राम सातपुते व रणजितसिंह मोहिते-पाटील हे दोन आमदार असतानाही तालुक्यातील एक हजार ७४७ मुली, पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील जवळपास अठराशे मुली, सुभाष देशमुख ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक हजार ४७४ मुली, संजय शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघातील ३०८ आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्या अक्कलकोट मतदारसंघातील १७६ मुलींचीही तशीच आवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT