raj thakceray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Solapur: राज ठाकरेंचा दौरा; मनसे सोलापुरात उमेदवार उभा करणार?

Maharashtra Assembly Election 2024: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी रविवारी (ता. ४) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी (ता. ४) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात ते मुक्कामी असतील, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीप धोत्रे यांनी दिली. सोमवारी पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

सप्टेंबरच्या मध्यावधीत राज्याच्या विधानसभेचे बिगूल वाजणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण, विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या अनुषंगाने राज ठाकरे सोमवारी (ता. ५) सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी तुळजापूरमार्गे ते धाराशिव येथे जाणार आहेत, असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत ‘मनसे’ जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पदाधिकाऱ्यांची आज बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता. २) सकाळी साडेदहा वाजता सोलापुरातील सोन्या मारुती कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, प्रशांत इंगळे, लोकसभा अध्यक्ष जैनोद्दिन शेख, शहराध्यक्ष अमर कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष अभिषेक रंपुरेआदी उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इस्लामपुरात कांटे की टक्कर! निशिकांत पाटलांचं जयंतरावांसमोर आव्हान; अजितदादांचा 'तो' डाव होणार यशस्वी?

Diwali 2024: दिवाळीला मिळालेले बोनसचे पैसे 'या' चार योजनांमध्ये गुंतवा; काही दिवसांत मिळेल जबरदस्त रिटर्न

त्याला कोणतीही पदवी मिळाली नाही पण... लक्ष्याच्या ७० व्या जन्मदिनाबद्दल प्रिया बेर्डेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाल्या?

Jalgaon Vidhan Sabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक; चाळीसगावला उन्मेष पाटलांचा प्रचार करण्यास नकार

Diwali 2024 Tulsi Upay: दिवाळीत करा तुळशी मंजुळाचे 'हे' खास उपाय, माता लक्ष्मीची कायम राहील कृपादृष्टी

SCROLL FOR NEXT