Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का; जवळचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? शाहांसोबत झालीये गुप्त भेट!

जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? अमित शहांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी बंड झालं. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला, तर काही नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तभेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. राष्ट्रवादीचे अनेक आमदार तसेच कार्यकर्त्यांनी अजित पवारांना समर्थन दिलं. दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र आपलं या बंडाला समर्थन नसल्याचं जाहीर केलं. ज्यांना जायचं आहे त्यांनी निघून जावं, मी राष्ट्रवादी पक्ष नव्याने उभारणार, असं म्हणत शरद पवारांनी बैठक देखील घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

अशातच शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामागचं कारणंही तसंच आहे. जयंत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती 'साम टिव्ही'ने खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर आता जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

या चर्चांवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया

या चर्चांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत बोलताना म्हणाले, 'जयंत पाटील आमच्याकडे येणार की नाही माहिती नाही. मागच्या काही दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन कदाचित त्यांचा विचार बदलला असेल तर माहिती नाही.'

जयंत पाटील भेटीच्या चर्चेवर काय म्हणाले?

जयंत पाटील यांनी अमित शाहा यांना भेटल्याचं वृत्त फेटाळलं आहे. 'ज्यांनी बातम्या दिल्या त्यांनीच मी कधी भेटलो ते सांगावं', असं ते म्हणाले. 'त्याचबरोबर मी कुठे गेलो तर मी तुम्हाला सांगेन, काल मी शरद पवार यांच्यासोबत होतो, त्यानंतर रात्री माझ्या घरी बैठक सुरू होती, मी शरद पवार यांच्यासोबत आहे, आणि कायम राहील. मी आज सकाळीही शरद पवार यांच्यासोबत होतो, माझी कोणासोबत चर्चा झालेली नाही, मी कोणाला भेटलो नाही, या भेटीच्या बातम्या कोणी पेरल्या याची मला कल्पना नाही', असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT