mantralay sakal
महाराष्ट्र बातम्या

5 वर्षांनंतर सोलापूरला मिळणार स्थानिक पालकमंत्री? सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी; दोन्ही देशमुख की कल्याणशेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला

२०१४ ते २०१९ या काळात विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून संधी मिळाली. पण, २०१९ ते २०१४ या काळात दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचे तर महायुतीत अडीच वर्षे चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. पाच वर्षे स्थानिक आमदाराला संधी मिळाली नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : २०१४ ते २०१९ या काळात विजयकुमार देशमुख यांना सोलापूरचे पालकमंत्री म्हणून संधी मिळाली. पण, २०१९ ते २०१४ या काळात दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडीचे तर महायुतीत अडीच वर्षे चंद्रकांत पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. पाच वर्षे स्थानिक आमदाराला संधी मिळाली नाही. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून आले. विधानसभेनंतर आता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल. त्यासाठी स्थानिक पालकमंत्री आवश्यक असून जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशकडे केली आहे.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे अवघे दोनच आमदार होते. त्या दोन्ही देशमुखांना राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. विजयकुमार देशमुख पालकमंत्री झाले आणि सुभाष देशमुख यांची सहकारमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून वर्णी लागली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर व माढ्यात भाजपचे खासदार निवडून आले. विधानसभेत आमदारांची संख्या दोनवरून पाच झाली. २०२४च्या विधानसभेतही सोलापूर जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आले.

२०१९ च्या विधानसभेनंतर राज्यात सुरवातीला अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. त्यांच्याकडूनही जिल्ह्यासाठी स्थानिक पालकमंत्री मिळू शकला नाही. अडीच वर्षानंतर भाजप महायुती सत्तेत आली आणि त्यावेळी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरचेच होते. आतातरी आम्हाला स्थानिक पालकमंत्री द्यावा, अशी मागणी भाजपच्या सोलापूर शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्या आमदाराच्या गळ्यात मंत्री तथा पालकमंत्रीपदाची माळ पडणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्यातरी दोन्ही देशमुख किंवा सचिन कल्याणशेट्टी यांच्याच नावाची चर्चा आहे.

देवेंद्र कोठे मुंबईला, चार आमदारही जाण्याच्या तयारीत

सोलापूर जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून भाजपच्या आमदारांना मुंबईतून बोलावणे आले का, यावरही सर्वांचे लक्ष आहे. आमदार सुभाष देशमुख म्हणाले, ‘मला अजून निरोप नाही मी घरीच आहे.’ तर देवेंद्र कोठे म्हणाले, मी मुंबईला निघालो आहे. तरीपण, पुढील काही तासांत भाजपचे जिल्ह्यातील उर्वरित आमदार देखील मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

प्रदेशकडे मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला पाच जागांवर यश मिळाले आहे. पाच वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेले नाही. आता जिल्ह्यासाठी एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी प्रदेशकडे केली आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. त्यावेळी जिल्ह्यातील मंत्र्यांचा मोठा फायदा होईल.

- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, भाजप, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

Gold Price: भारताच्या शेजारील देशात सोने झाले 16,000 रुपयांनी स्वस्त; खरेदीसाठी लोकांची झुंबड, काय आहेत भाव?

Solapur Municipal Corporation: दोन देशमुखांमध्ये देवेंद्र कोठेंची एन्ट्री; महापालिकेत भाजपच्या साथीने शिवसेना- राष्ट्रवादीची पहिली लढाई

SCROLL FOR NEXT