sakal solapur
महाराष्ट्र बातम्या

हद्दवाढीतील जागांचे प्रश्न सुटणार? जागा मालकांना लवकरच प्रॉपर्टी कार्ड; ‘भूमिअभिलेख’कडून नेहरु नगरचा पायलट प्रोजेक्ट

'हद्दवाढ'मधील वर्षानुवर्षांचे वाद कायमचे मिटणार आहेत. 'भूमिअभिलेख'च्या माध्यमातून नेहरु नगरचा पायलट प्रोजेक्ट तयार केला जात आहे. ७३२ हेक्टरवरील मिळकतींची 'रोव्हर'द्वारे पाहणी झाली. त्याचा अहवाल जमाबंदी आयुक्तांना सादर केला आला असून दिवाळीपूर्वी काम सुरु होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : हद्दवाढ भागातील १२ गावांमधील मिळकतदारांचे वर्षानुवर्षांचे वाद आता कायमचे मिटणार आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून नेहरु नगरचा पायलट प्रोजेक्ट तयार केला जात आहे. ७३२ हेक्टरवरील मिळकतींची रोव्हर मशिनद्वारे पाहणी झाली असून त्याचा अहवाल जमाबंदी आयुक्तांना सादर करण्यात आला असून दिवाळीपूर्वी त्याचे काम सुरु होणार आहे.

१९९२ मध्ये शहरालगतचा हद्दवाढ भाग महापालिकेत समाविष्ट झाला. त्यात शेळगी, विडी घरकूल, दहिटणे, देगाव (बसवेश्वर नगरसह), कुमठे, केगाव, सोरेगाव (प्रतापनगरसह), बाळे, कसबे सोलापूर, जुळे सोलापूर, नेहरू नगर, मजरेवाडी या परिसराचा समावेश होता. ३१ वर्षानंतरही त्यातील बहुतेक भागात ना डांबरी रस्ते ना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली. गुंठेवारीला परवानगी बंद असल्याने अनेकांनी मूळ मालकाकडून जागा घेऊन त्याठिकाणी कच्ची किंवा पक्की घरे बांधली आहेत.

प्रॉपर्टी कार्ड देखील मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांना बॅंकांकडून कर्जही मिळेना आणि शासकीय योजनांचा लाभही घेता येईना, अशी अवस्था आहे. त्यावर आता कायमचा तोडगा निघणार असून भूमिअभिलेखद्वारे हद्दवाढीतील सर्वच मिळकतींची मोजणी होऊन स्वतंत्र नकाशे (सनद) व मालमत्ता पत्रक तयार होणार आहे. त्यासाठी जुना एम्लॉयमेंट चौकात स्वतंत्र कार्यालय सुरु केले असून तेथून हे संपूर्ण कामकाज पाहिले जाणार आहे. त्यानंतर कोणीही कोठूनही त्यांच्या जागेचा नकाशा मोबाईलवर पाहू शकणार आहे.

पुन्हा कोणालाही स्वतंत्र मोजणी करून घेण्याची गरज भासणार नाही, असा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्यासाठी महापालिकेने आतापर्यंत भूमिअभिलेख कार्यालयास पाच कोटी रुपये दिले आहेत.

पायलट प्रोजेक्ट काय आहे?

  • - दिवाळीपूर्वी नेहरू नगरच्या हद्दवाढ भागातील ७३२ हेक्टरवरील संपूर्ण मिळकतींची मोजणी सुरु होईल.

  • - रोव्हर मशिनद्वारे प्रत्येक मिळकतदारांचे क्षेत्र मोजले जाणार व त्यानुसार तेथील सद्य:स्थिती समोर येईल.

  • - प्रत्येक मिळकतदारांच्या जागेची सनद (नकाशा) तयार होऊन मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल.

  • - शासकीय जागांवरील अतिक्रमण किंवा स्वत:च्या क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम केल्यास तेही उघड होणार.

  • - संपूर्ण मालमत्ता महापालिकेच्या रेकॉर्डला येतील व जमिनीची खरेदी-विक्रीवेळी होणारी फसवणूक टळेल.

मजरेवाडी १० मीटरचा रस्त्याच गायब

नेहरू नगरच्या पायलट प्रोजेक्टवर काम करताना उत्तर सोलापूरच्या भूमिअभिलेख कार्यालयाने ७३२ हेक्टरवरील जागांची (इमेज) रोव्हर मशिनद्वारे पाहणी केली. त्यावेळी अक्षरश: मजरेवाडीतील एका नगरात १० मीटरचा रस्ताच गायब असल्याचे समोर आले. तर अनेक ठिकाणी १० मीटरच्या रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने तो रस्ता रस्त्या सध्या पाच मीटरपर्यंतच शिल्लक राहिल्याचेही दिसून आले. आता पायलट प्रोजेक्टरला जेव्हा सुरवात होईल, त्यावेळी महापालिका व पोलिसांच्या मदतीने संपूर्ण हद्दवाढ भागातील अतिक्रमण हटविले जाईल, अशी माहिती ‘भूमिअभिलेख’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT