मुंबई : महाराष्ट्रात आता येणाऱ्या काळात किराणा दुकानात वाईन मिळणार आहे. तुम्ही जर किराणा दुकानात गहू, तांदुळ किंवा इतर वस्तू घेण्यास गेलात आणि तिथे तुम्हाला वाईन दिसल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर सरकारने अध्यादेश काढून घोषणा केली आहे. (Wine Selling in Super Market)
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. तसेच आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री (Wine Selling) केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं असलं पाहिजे ही अट घालण्यात आली आहे. दुकानात यासाठी एक शोकेस बनवून वाईन विक्री करता येणार आहे असं सरकारने अध्यादेशात म्हटलं आहे.
या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच वाईनच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शेती उत्पादनाला विक्रिसाठी व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच द्राक्षे, मोसंबी, संत्रा, उस तसेच वाईननिर्मितीसाठी लागणाऱ्या पिकाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. त्याचबरोबर राज्यात वायनरी जास्त असल्याने त्यांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं सरकारनं म्हटलंय.
याअगोदर भाजपने गोवा, हिमाचलप्रदेश आणि भाजप शासित राज्यात हे धोरण आणलं आहे त्याचप्रकारे हे धोरण आता राज्यसरकारने महाराष्ट्रातही लागू केलं आहे.
मात्र आता किराणा दुकानातून दारु खरेदी करताना एका लीटरमागे १० रुपये कर आकारला जाणार आहे. या अतिरिक्त करामुळे राज्यसरकारच्या तिजोरीत ५ कोटींचा अधिकचा महसूल जमा होणार आहे. त्याचबरोबर वाईन विक्रीची माहीतीसुद्धा मिळण्यास सरकारला मदत होणार आहे. भविष्यात या निर्णयाचा फायदा सरकारला होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.