Ajit Pawar on Girish Mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'गिरीश महाजनांचे कॉन्टॅक्ट चांगले, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी' पवारांनी काढले चिमटे

संतोष कानडे

नागपूरः राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांनाचाच त्यांनी समाचार घेतला. ते बोलत असतांना सभागृहात सदस्य पोट धरुन हसत होते.

तर मुद्दा होता मुख्यमंत्रीपदाचा. राज्यातील सर्व विभागांना मुख्यमंत्रीपद मिळालं परंतु उत्तर महाराष्ट्राला मिळालं नाही, असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी खालून कुणीतरी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं. त्यावर अजित पवारांनी महाजानांना चांगलेच चिमटे काढले.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

अजित पवार म्हणाले, गिरीश महाजानांना मुख्यमंत्रीपद नव्हे तर मोठी जबाबदारी देण्याचं ठललंय. त्यांना युनायटेड नेशनची जबाबदारी देऊ, आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढीसाठीची जबाबदारी त्यांनी मिळणार असल्याचा चिमटा त्यांनी काढला. यानंतर सभागृहात हशा पिकला.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करु, असं भाजपचे नेते म्हणाले होते. परंतु आमचं तिथं काम आहे. मी ठरवलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करु शकतो. मी कसा आहे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे. देवेंद्रजीं म्हणतात, तसं मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, असंही अजित पवार बोलतांना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

'फक्त विग आणि मिशी घालून कुणी पृथ्वीराज होत नाही', मुकेश खन्नांनी उडवली अक्षय कुमारची खिल्ली

Stock Market: शेअर बाजारातील घसरणीत मोठा दिलासा! निफ्टी लवकरच करणार नवा विक्रम, पण कधी?

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayant Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

SCROLL FOR NEXT