Ladki Bahini Yojana Esakal
महाराष्ट्र बातम्या

5 दिवसांतच सव्वाकोटी लोकांनी डाऊनलोड केले ‘नारीशक्ती दूत’ॲप! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत 5 लाखांहून अधिक अर्ज अपलोड

आतापर्यंत राज्यातील एक कोटी ३२ लाखांहून अधिक लोकांनी ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड केले आहे. मागील पाच दिवसांतच तब्बल १५ हजार जीबी डेटा ॲप डाऊनलोड करण्यातच खर्ची झाल्याची बाब समोर आली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्यानंतर ‘नारीशक्ती दूत’ हे ॲप विकसित केले. त्यावर लाभार्थींना ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत राज्यातील एक कोटी ३२ लाखांहून अधिक लोकांनी ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड केले आहे. मागील पाच दिवसांतच तब्बल १५ हजार जीबी डेटा ॲप डाऊनलोड करण्यातच खर्ची झाल्याची बाब समोर आली आहे.

वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असलेल्या महिलांना ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. सध्या हजारो लाभार्थी ऑफलाइन अर्ज करीत आहेत. अजूनही अनेकांना ‘नारीशक्ती दूत’ ॲपबद्दल माहिती नाही. दररोज २२ ते २५ हजार लोक हे ॲप डाऊनलोड करीत आहेत. १ ते ५ जुलै या अवघ्या पाचच दिवसात सव्वाकोटी लोकांनी ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड केले आहे. अर्ज भरण्यापूर्वी ॲप डाऊनलोड करावे लागते आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक, ई-मेल टाकून प्रोफाइल तयार करावे लागते. त्यानंतर अर्ज उघडतो आणि त्यावरील वैयक्तिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा लागतो. कागदपत्रांमध्ये (उत्पन्न व रहिवासी दाखला) शासनाने नवीन निर्णय घेऊन सवलत दिल्याने अर्जांचा ओघ वाढू लागला आहे. ५ जुलैपर्यंत ॲपवर अंदाजे पाच लाखांहून अधिक अर्ज अपलोड झाले असून ऑफलाइन अर्जांची संख्या देखील दोन लाखांपर्यंत आहे.

ऑफलाइन अर्जदारांना पुन्हा हेलपाटा

१ जुलैपासून ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना केली असून लाभार्थींना घरबसल्या देखील अर्ज भरता यावा म्हणून ‘नारीशक्ती दूत’ ॲप तयार करण्यात आले आहे. मात्र, अनेकजण अंगणवाड्यांमध्ये ऑफलाइन अर्ज जमा करीत आहेत. तो अर्ज ज्यावेळी अंगणवाडी सेविका अपलोड करतील, त्यावेळी संबंधित लाभार्थीला फोटो काढून अपलोड करण्यासाठी त्याठिकाणी पुन्हा एकदा जावे लागणार आहे. त्यामुळे आता ‘नारीशक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत

सोलापूर जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत जवळपास १३ हजार लाभार्थी महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत. ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑनलाइन अपलोड केले जात आहेत. पण, अर्ज भरताना संबंधित महिलांचा फोटो काढून तोही अर्जासोबत अपलोड करावा लागतो. त्यामुळे त्यांना पुन्हा त्याठिकाणी बोलावून घेतले जात आहे. पण, आता ऑनलाइन ‘नारीशक्ती दूत’ ॲप आले असून त्यावरून अर्ज भरण्याची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

- प्रसाद मिरकले, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

योजनेची स्थिती

  • आतापर्यंत ॲप डाऊनलोड

  • १.३२ कोटी

  • ‘ॲप’ची साईज

  • १.१३ एमबी

  • आतापर्यंत डाटा डाऊनलोड

  • १४,९१६ जीबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT