Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

कार्यकर्त्याने पाय धुतलेच नाहीत; व्हिडिओवरून वाद निर्माण झाल्यानंतर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

कार्तिक पुजारी

मुंबई- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून चिखलात माखलेले पाय धुऊन घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून विरोधकांनी पटोले यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यावरून नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

पाय धुण्याचा व्हिडीओ मी पाहिला आहे. पालखी दर्शनासाठी मी गेलो होतो. त्यावेळी ⁠पाय चिखलाने माखले होते. ⁠कार्यकर्त्यांनी पाणी आणलं, एक कार्यकर्ता वरून पाणी टाकत होता आणि मी पाय धुवत होतो. पण माझ्यावर विशेष प्रेम का? ⁠अंधारात कोणाचे कोण पाय धुतात हे माहीत आहे. मी तर सर्वांच्या समोर होतो. मी राजा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असं नाना म्हणाले.

काहींचे माझ्यावर जास्त प्रेम आहे पण मला फरक पडत नाही. ⁠हर घर में जल नाही, नल नाही म्हणून कार्यकर्ता पाणी वरतून टाकत होता . ⁠मी चिखलात राहणारा माणूस आहे. ⁠ईडी आणि सीबीआयने कोणाचे किती पाय माखले आहेत आणि कोण कोणाचे पाय पकडत आहे हे माहीत आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

उज्ज्वल निकम हे लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता त्यांचीच सरकारी वकील म्हणून निवड करण्यात आली आहे. यावरून भाजपचा कसा दुष्टपणा सुरू आहे हे दिसून येतं. सरकारनं उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील केलंय. त्यामुळं वकीलही आता भाजपचा राहणार का? भाजपच्या उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही. त्याला आमचा विरोध आहे, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी यावेळी नीट परीक्षेबाबतही भाष्य केलं.नीटच्या परीक्षा रद्द कराव्यात. परीक्षेमध्ये किती गोंधळ झालाय. पोलीस भरतीच्या ग्राऊंडवर चिखल झालेला आहे. त्यामुळं उमेदवारांना दुखापत होतेय. पावसाळ्यानंतर शारीरिक चाचणी व्हावी. शेतकऱ्याकडे बियाणं उपलब्ध नाहीये. बोगस बियाणं दिलं जात आहे. आंध्र, गुजरातमधून हा पुरवठा होत आहे, असं पटोले म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

..तरच गोवा-तमनार प्रकल्पाला मंजुरी देणार; मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र

Alia Bhatt : "मी मोबाईलमध्ये पुरावा जपून ठेवलाय" राहामुळे झालं होतं रणबीर-आलियामध्ये भांडण ; लेकीबद्दल बोलताना अभिनेत्री भावूक

Latest Marathi News Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमाच्या प्रदर्शनाला भेट दिली

Viral: माझा पती दरवर्षी नवीन मुलीसोबत लग्न करतो, ५ वेळा थाटलाय संसार, पहिल्या पत्नीनं फोडलं बिंग

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

SCROLL FOR NEXT