महाराष्ट्र बातम्या

World Vision Day: देशभरात चार लाख दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रपटलाची गरज

अर्चना बनगे

कोल्हापूर: देशभरात चार लाख दृष्टिहीनना काॅर्नीयाची(Corneal) (नेत्रपटल) गरज आहे. देशात मोठ्या प्रमाणात नेत्रदान(Eye donation) झाले तर अशा गरजूंना दृष्टी मिळेल. आज 'जागतिक दृष्टिदान दिन' (World Vision Day)असून समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेकदा नेत्रदान कसे करावे, कोण करू शकतं, नेत्रदान म्हणजे नेमकं काय आहे ? याची बऱ्याच जणांना माहिती नसते. ही माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्र रोग तज्ञ डॉ. विजय कुबेर मगदूम (Ophthalmologist Dr. Vijay Kuber Magdoom)यांच्याशी संवाद साधला.त्यांनी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल.(world-vision-day-eye-donation-information-marathi-news)

जगातील माणसाचा कॉर्निया माणसाला बसवण्याची पहिली शस्त्रक्रिया झेकोस्लोव्हाकियामध्ये डॉ. झेकोस्लोवाकीयामध्ये डाॅ.झीरम यांनी 7 डिसेंबर 1905 केली. तर भारतात पहिली कॉर्निया ट्रान्सप्लांट इंदोर मध्ये डॉ. धांडा यांनी केली. जगातली पहिली नेत्रपेढी ही न्यूयॉर्कमध्ये 1944 ला स्थापन झाली. तर चेन्नई मध्ये 1945 ला पहिली आय बँक स्थापन झाली. अंधांचा आवाज ही नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड की भारतातील अंधांचे सर्वात मोठी मदत संस्था आहे. ''लेट ब्लाइंड, लीड द ब्लाइंड'' या तत्त्वावर याची स्थापना केली गेली.

खरंतर नेत्रदान ही संकल्पना पूर्वापार चालत आलेली आहे. वाल्मिकीने रामायणात नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होतो असेही सांगितले आहे.

शैब्य: श्येनकपोतीये स्वमांसं पक्षिणे ददौ I

अलर्कश्र्चक्षुषी दत्त्वा जगाम गतिमुत्तमाम II

वाल्मिकी सांगतात, शब्बीर राजाने बहिरी ससाणा व कबुतरात संघर्ष चालू असताना स्वतःचे मांस ससान्याला दिले आणि राजाने स्वतःचे डोळे दान करून उत्तम गणेश म्हणजे मोक्षाला प्राप्त झाला.

याच बरोबर भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीमध्ये सुखी जीवन जगण्यासाठी पंचशील आर्य अष्टांग मार्ग दिला आहे. यामध्ये दहा परिमिता सांगितल्या आहेत. या दहा पारमितापैकी तिसरी पारमिता म्हणजे दान. त्यामध्ये नेत्रदान सुद्धा आले. भारतामध्ये नेत्रदान संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत. तर आज जाणून घेऊया नेत्रदान कसे करावे.

1) नेत्रदान म्हणजे काय?

-नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यांमधील काळ्‍या बुबळ्याची वरची जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे म्हणजे नेत्रदान. नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही.

2) नेत्रदान कोण करू शकते?

वय,लिंग ,रक्तगट किंवा धर्म असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते.

3) नेत्रदान कोण नाही करू शकत?

ज्या व्यक्तींना कॅन्सर, रेबीज, मलेरिया, हिपॅटायटिस बी किंवा सी, टिटॅनस, मेंदू ज्वर झाला असेल तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.

4) मला चष्मा आहे, मी नेत्रदान करू शकते का?

होय चष्मा असलेली व्यक्ती नेत्रदान करू शकते. याशिवाय डोळ्याचे ऑपरेशन झाले असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो.

5) मला मधुमेह आहे मी माझे डोळे दान करू शकतो का?

मधुमेहाचे रुग्ण किंवा उच्चरक्तदाब ग्रस्त असलेले रुग्ण, दमा असणारे रुग्ण हे डोळे दान करू शकतात. याशिवाय मोतीबिंदू असलेली कोणतीही व्यक्ती त्यांचे डोळे दान करू शकते. मात्र संसर्गजन्य आजार असलेली व्यक्ती आपले डोळे दान करू शकत नाही.

6) मृत्यूनंतर कॉर्निया किती लवकर काढावा?

मृत्यू झाल्यानंतर अवघ्या सहा ते आठ तासात हा कॉर्निया काढावा. त्याच बरोबर दोन तासात काढलेला कॉर्निया अतिशय उत्तम असतो.

7) नेत्रदानासाठी कोणता अर्ज भरावा?

नेत्रदानासाठी आपल्याला तारण फॉर्म भरावा लागतो. आपल्या जवळच्या कोणत्याही नेत्रपेढीत हा फॉर्म भरून पाठवावा लागतो .तुम्ही नेत्र दाता म्हणून नोंदणी केली की तुम्हाला कार्ड दिले जाते. मृत्यूपश्चात जरी नोंदणी केली नसेल तरीही कुटुंबाच्या अनुमतीने नेत्रदान करता येते.

8) मृत्यू घरी झाल्यास नेत्रदान कसे करावे?

मृत्यू घरी झाल्यास घाबरण्याचे काही कारण नाही. नजीकच्या नेत्र पेडीत संपर्क साधल्यास ते लोक येऊन कॉर्निया घेऊन जातात.

9)मृत्यू झाल्यानंतर कॉर्निया घ्यायच्या आधी कोणती दक्षता घ्यावी?

मृत्यू झाल्यानंतर कॉर्निया घ्यायच्या आधी डोळे बंद करावेत,डोळ्यावरती ओला कापूस ठेवावा. त्याचबरोबर फॅन, एसी हे बंद ठेवावे.

10)कोल्हापूर जिल्ह्यात कोठे आय बँक आहे?

सीपीआर हॉस्पिटल,

डी वाय पाटील हॉस्पिटल

,अस्टर आधार हॉस्पिटल

,डॉ. जोगळेकर,

आदित्य आय बँक, संज्योत नेत्रालय इचलकरंजी.

या ठिकाणी नेत्रदान बँक आहे.

भारतामध्ये चार लाख लोकांना नेत्रदानाची गरज असते. प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच असते. नेत्रदानामुळे खुप जणांची नजर सुधारते. मात्र भारतात जितके डोळे पाहिजे तेवढे मिळत नाही. यासाठी आता समाजाने एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे.

मरणोत्तर नेत्रदान या बाबत मोठ्या जागरूकतेने काम केल्यास नक्कीच अनेक दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो. यासाठी विविध घटकांची सजगता महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया एक चळवळ म्हणून सुरू झाल्यास नक्कीच देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीस नेत्ररोपण होऊ शकेल.

डॉ. विजय कुबेर मगदूम ,नेत्ररोग तज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT