दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केली जाते (World Happiness Report 2022) , यंदा संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या वार्षिक आनंद निर्देशांकात फिनलंड हा सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. जारी करण्यात आलेल्या या यादीत 146 देशांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केंद्र सरकारला 'पुराने दिन'च 'अच्छे' होते, असा टोला लगावला आहे.
त्यांनी ट्विट करत 'पुराने दिन'च 'अच्छे' होते. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक सातत्याने खाली जातोय. मोदी सरकारच्या काळात सातत्याने भारत दुःखी राष्ट्रांच्या यादीत आहे. असे म्हटले, त्यांनी पुढे लिहले की, "आंतरराष्ट्रीय संस्थांचे असे अहवाल पाहिले की वाटतं 'पुराने दिन' खरोखरच किती 'अच्छे' होते. दरम्यान सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो.
जगात सगळ्यात आनंदी देशांपैकी पहिल्या पाच देशांमध्ये डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. तर अमेरिका आणि ब्रिटन हे देश 16 व्या आणि 17 व्या क्रमांकावर आहेत. तर भारताचा क्रमांक हा 136 व्या आहे. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक 139 वा होता.
जगातील सर्वात आनंदी दहा देश
1. फिनलंड
2. डेन्मार्क
3. आइसलँड
4. स्वित्झर्लंड
5. नेदरलँड
6. लक्झेंबर्ग
7. स्वीडन
8. नॉर्वे
9. इस्रायल
10. न्यूझीलंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.