महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या त्यांच्या स्पष्ट व्यक्तिमत्वामुळे सतत चर्चेत असतात अशातच एका महिला आयोगाच्या कार्यक्रमामध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. एकवेळ कोस्टल रोडसाठी पैसे दिले नाहीत तरी चालेल पण मुले आणि महिलांसाठी पैसे द्यावेत यासाठी मी भांडते, अशा शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यसरकारला सुनावले. त्यांच्या खात्याला निधी मिळण्यासाठीचा संघर्ष त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
“पदभार स्विकारल्यापासून सातत्याने महिला धोरणासंदर्भात मी पाठपूरावा करत आहे. कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालये आहे मग आपल्याकडे का नाही?” असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. "महिला आयोगाने याकडे लक्ष द्यायला हवे. मंत्रीमंडळात यशोमती ठाकूर फार आरडाओरडा करतात असे ऐकालया मिळते. कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल पण महिला आणि मुलांना पैसे मिळालेच पाहिजेत. यासाठी मी भांडते" असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारच्या यशाचे श्रेय मंत्री यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांना दिले. शरद पवारांमुळेच सरकार उत्तमपणे सुरु आहे, असे सांगत त्यांनी शरद पवारांचे कौतुक केले. सोबत महाविकास आघाडीचे सरकार अजून बरेच कामे करु शकते असेही त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.