Yashwantrao Chavan Sakal
महाराष्ट्र बातम्या

Yashwantrao Chavan : ‘मी, समुद्र आणि सावरकर’; यशवंतराव रत्नागिरीला चालत गेले तो दिवस

Pooja Karande-Kadam

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांची ओळख आहे. साहित्यिक, राजकारणी, रसिक, खास वक्तृत्वशैली असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व. आज त्यांचा स्मृतीदिन. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी यशवंतराव चव्हाणांनी केली, असे म्हटले जाते. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. पण, त्यांची आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीचे वर्णन त्यांनी ‘मी, समुद्र आणि सावरकर’ अशा सोनेरी शब्दात केले आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.

यशवंतरावांचा जन्म 12 मार्च 1913 ला सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्रे या गावी झाला. कराड इथल्या नगरपरीषदेच्या शाळेत त्यांचं शिक्षण झाले. वयाच्या चौथ्या वर्षापासून ते पार्लमेंटरी सेक्रटरी होईपर्यंत यशवंतरावाचे वास्तव्य कराडमध्येच होतं महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी देशसेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच १ मे, १९६० मध्ये मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल.

त्याच्या जीवनात अनेक भाग्यकारक घटना घडल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांची रत्नागिरीत झालेली भेट होय. कारण, या भेटीसाठी यशवंतराव चालत रत्नागिरीला पोहोचले होते. काय होता तो प्रसंग, आणि ‘तो माझ्यासाठी भाग्याचा दिवस’ असे का म्हणाले यशवंतराव चव्हाण. याबद्दल अधीक जाणून घेऊयात.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहसी व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या अनेक गोष्टी यशवंतरावांनी ऐकल्या होत्या. वाचल्या होत्या.त्यावेळी 'श्रद्धानंद' मध्ये प्रसिद्ध होत असलेली सावरकरांची 'माझी जन्मठेप' ही काळ्या पाण्याच्या शिक्षेची आत्मकहाणीही ते अधूनमधून वाचत होते. स्वातंत्र्यासाठी बेहोशीने आपले जीवन उधळून टाकणाऱ्या त्या सावरकरांच्या मूर्तीला आपण केव्हा पाहतो, याची उत्सुकता यशवंतरावांना होती. त्यासाठीच रत्नागिरीला पायी चालत जाण्याचा घाट घालण्यात आला होता.

ते काम या दोघांनी पार पाडल्यावर लिमये यांनी आपल्या पूर्वजांच्या रत्नागिरीस जाण्याचा बेत केला. यशवंतरावांनी तेव्हा समुद पाहिला नव्हता. रत्नागिरीला जाऊन सागर व तिथे स्थानबद्ध असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दर्शन होईल असा त्यांचा विचार होता. रत्नागिरीत ते मित्र लिमये यांच्या घरी थांबले होते. त्यावेळी लिमये यांनीच सावरकर आणि यशवंतराव यांच्या भेटीची सोय केली. लिमयेंनी दुसऱ्या दिवशी सकाळची दहाची वेळ ठरवली होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता यशवंतराव आणि रघूआण्णा सावरकरांच्या भेटीसाठी इच्छीत स्थळी पोहोचले. एका मध्यम खोलीत चार खुर्च्या मांडलेल्या होत्या. तेथे त्यांना बसविण्यात आले. आतमध्ये सावरकरांना कोणी तरी भेटायला आल्याने त्यांचा आवाज कानावर पडत होता. ती माणसे गेली आणि सावरकर यशवंतराव बसले होते तिथे आले.

सावरकरांचे वर्णन यशवंतराव असे करतात, मध्यम उंचीचे, काहीसे किरकोळ बांध्याचे, डोळ्यांवर चष्मा आणि त्या- पलीकडून पाहणारी त्यांची भेदक नजर अशी ती मूर्ती समोर आली. अंगात स्वच्छ पांढरा सदरा आणि तितकेच स्वच्छ पांढरे सैलसे धोतर, पायांत साध्या वहाणा अशा घरगुती वेषात ते होते.

यशवंतराव हायस्कूलमध्ये शिकणारे एक विद्यार्थी आहेत. हे समजल्यावर त्यांनी कौतुकाने विचारले, एवढा लांबचा प्रवास कशासाठी केलास, बाळ?"

तेव्हा यशवंतरावांच्या सोबत असलेल्या राघूअण्णांनी आम्ही मिठाच्या सत्याग्रहातील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले. त्यावेळी "मोठेच पराक्रमी दिसता तुम्ही!" खळखळून हसत सावरकर यशवंतरावांना म्हणाले, ‘तुम्हांला मला काही विचारायचं आहे काय?" या सावरकरांच्या प्रश्नावर यशवंतराव एका श्वासात बोलून गेले की, मला काही विचारायचं नाही. केवळ मला आपणांस डोळे भरून पाहायचं होतं."

त्यावर सावरकर म्हणाले, ‘माझ्यात बघण्यासारखं काय आहे? मी तुमच्यासारखाच माणूस. तुमच्या आधी काही वर्ष जन्माला आलो. देशसेवेचं व्रत घेतलं आणि बलिदानाची प्रतिज्ञा करून कामाला लागलो. यात विशेष असं काय आहे? आमच्या पिढीला जे योग्य वाटलं, ते करायचा प्रयत्न केला. आता तुमची नवी पिढी काय करते, ते पाहायचं आहे’

त्यानंतर सावरकर थोडे गंभीर झाले. त्यांनी आठवण झाली नाशिकच्या अनंत कान्हेरे यांची. पुढे ते यशवंतरावांना म्हणाले की, ‘तुम्ही मंडळी मोठ्या संख्येने चांगले काम करता आहात. परंतु स्वातंत्र्य आंदोलनासाठी जेव्हा कोणीच तयार होत नव्हतं. तेव्हा एकटेच आम्ही हे राष्ट्रकार्य करत होतो. त्यातले अनंत कान्हेरे फासावर गेले. हल्लीचे तुम्ही लोक त्या बलिदानाला विसरला आहात, अशी मला उगीच हळहळ वाटते.

सावरकरांच्या या प्रश्नाला राघूअण्णांनी उत्तर दिले, "आम्ही कसं विसरू? आपल्याकडूनच स्फूर्ती घेऊन त्यांनी बलिदान केलं, म्हणूनच आपलं दर्शन घ्यायला आम्ही आलो आहोत, असे ते म्हणाले. ते ऐकूण सावरकरांना बरे वाटले.

त्यानंतर काहीवेळ बोलून यशवंतरावांनी सावरकरांचा निरोप घेतला. यशवंतराव आणि रघूआण्णा तिथून बाहेर पडले. यशवंतराव या भेटीबद्दल खूप छान लिहीले आहे, ते असे म्हणतात की, सागर आणि सावरकर हे रत्नागिरीत एकाच वेळी पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे रत्नागिरीची माझी आठवण ह्या भेटीशी कायमची संलग्न झालेली आहे.

सावरकांना भेटल्याचे यशवंतरावांच्या मित्रांना पटले नाही. पण, नंतर जेव्हा त्या भेटीचे संक्षिप्तमध्ये वर्णन केले तेव्हा मात्र सगळे मित्र डोळे विस्फारून सर्वकाही ऐकत होते. यशवंतरावांनी १९३० सालच्या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटनांपैकी ही एक घटना असल्याचेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT