महाराष्ट्र बातम्या

जश्मीन वानखेडे, समीर वानखेडे आणि मनसे कनेक्शन, काय आहे प्रकरण?

सकाळ डिजिटल टीम

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर राज्यात एनसीबी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. शनिवारी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत जश्मीन वानखेडे यांचा उल्लेख केला. जश्मीन वानखेडे या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहिण आहेत. त्या व्यवसायाने क्रिमिनल लॉयर आहेत.

मनसेच्या चित्रपट सेनेत त्या पदाधिकारी असल्याचे समजते. जश्मीन वानखेडे यांच्या फेसबुक प्रोफाईलवरही तसा उल्लेख दिसतो. मनसेच्या नेत्यांसोबतचे फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत.

जश्मीन वानखेडे यांनी तीन दिवसांपूर्वी इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात भाऊ समीर वानखेडेच्या कामाचं कौतुक करण्याऐवजी लोकांकडून पाळत ठेवण्याचं काम केलं जातंय याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली होती.

मुलाखतीत जश्मीन यांनी काय म्हटले होते?

जश्मीन म्हटलं होतं की, माझा भाऊ हा निडर आहे, निधड्या छातीने तो कारवाई करतो. आम्हाला अनेकदा भीती वाटते पण त्याच्या धाडसापुढे आमची भीती तोकडी पडते. त्याच्या कारवाईमुळे अनेकदा भीती असते पण देशासाठी त्याच्या कामासमोर आमची भीती काहीच नाही असंही जश्मीन यांनी सांगितलं होतं.

मी, माझे वडिल आणि भाऊ-वहिनी असं चौघांचं कुटुंब आहे. तो आम्हाला कधीच त्याच्या केसेसबाबत सांगत नाही. त्याच्यावर राजकीय लोकांकडून टीका केल्या जात आहेत. याबद्दल त्या म्हणाल्या की, आम्ही प्रामाणिक लोक आहे, जो कोणी प्रामाणिकपणे काम करतो तो वाईट आणि चांगल्या दोन्हीकडे समान दृष्टीने पाहतो. संविधान आमच्यासाठी सर्व आहे. आम्ही त्यानुसार काम करतो असंही जश्मीन म्हणाल्या होत्या.

आम्हाला जात-धर्म याचे राजकारण करायचे नाही. लहान मुलं त्यांचे पालक येऊन आभार मानतात. ड्रग्जला रोखण्यासाठी जे काम तो करतोय ते चांगलंच आहे. आज नाही तर ५ वर्षानंतर तुम्ही तुमच्या मुलालाच वाचवताय. ड्रग्जचं व्यसन असलेल्यांना तुम्ही वाचवताय हे नक्कीच चांगलं काम आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.

पोलिस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत असा आरोप समीर वानखेडेंनी केला होता. ज्यांची मुलं ड्रग्जच्या आहारी गेली आहेत. त्यांना वाचवण्याची शपथ एनसीबीने घेतली आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय स्वत:चं आयुष्य धोक्यात घालून काम करत असलेल्या लोकांचे आभार मानले पाहिजे. पण त्यांच्यावरच नजर ठेवली जाते हे खरंच दुर्दैवी आहे असंही जश्मीन वानखेडे यांनी म्हटलं होतं.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही मुलाखत दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, वाशिम जिल्ह्यातील एका लहान गावातून आम्ही आलो. मी पोलिस उपनिरिक्षक होतो. घरात मुलगा आणि मुलगी यात असा काही भेदभाव नव्हता. दोघेही एकत्र वाढले आणि त्यांनी मला वर्दीत पाहिलं होतं. दोघांनीही माझ्याच पावलावर पाऊल टाकलं. एक पालक म्हणून असं वाटतं की, समीर जे काही समजासाठी काम करतोय. नशामुक्तीसाठी करत असलेल्या त्याच्या कामाचं लोकांनी कौतुक करायला हवं. पण त्याच्या धाडसी कारवायांमुळे एक पालक म्हणून भीतीही समीर वानखेडेंच्या वडिलांनी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT