Avinash Bhosala and Sanjay Chabria Sakal
महाराष्ट्र बातम्या

संजय छाब्रिया अन् अविनाश भोसलेंना ईडीचा धक्का; ४१५ कोटींची मालमत्ता जप्त

संजय छाब्रिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील ११६.५ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे.

सकाळ डिजिटल टीम

Yes Bank-DHFL Case : येस बँक DHFL फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने संजय छाब्रिया आणि अविनाश भोसले यांची मालमत्ता जप्त केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपये आणि अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपये (एकूण 415 कोटी रुपयांची मालमत्ता) जप्त केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रेडियस डेव्हलपर्सचे संजय छाब्रिया आणि एबीआयएल इन्फ्रास्ट्रक्चरचे अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

संजय छाब्रिया यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथील 116.5 कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश आहे. याशिवाय सांताक्रूझ येथे असलेला 3 कोटी रुपयांचा फ्लॅट, दिल्ली विमानतळावर असलेल्या छाब्रियाच्या हॉटेलमधून 13.67 कोटी रुपयांचा नफा आणि 3.10 कोटी रुपयांच्या तीन लक्झरी कारचाही समावेश आहे. त्याचवेळी अविनाश भोसले यांच्याकडे मुंबईत 102.8 कोटी रुपयांचा डुप्लेक्स फ्लॅट आहे. याशिवाय पुण्यातील 14.65 आणि 26.24 कोटी रुपयांची जमीन, नागपुरातील 15.52 कोटी रुपयांची आणि 1.45 कोटी रुपयांची आणखी एक जमीन जप्त करण्यात आली आहे.

सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने येस बँकेचे राणा कपूर आणि डीएचएफएलचे कपिल वाधवन आणि धीरज वाधवन प्रवर्तकांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. राणा कपूरने M/s DHFL चे प्रवर्तक संचालक कपिल वाधवन आणि इतरांसोबत M/s DHFL ला येस बँक लिमिटेडद्वारे आर्थिक सहाय्य देण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे.

डीएचएफएलशी संबंधित 34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी नुकतेच केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्या परिसरातून ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर जप्त केले होते. 2011 मध्ये वर्वा एव्हिएशननेचे AW109AP हेलिकॉप्टर 36 कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. वर्वा आशियाईचा मालकी हक्क असोसिएशन ऑफ पर्संसकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT