मुंबई : ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) तर्फे आयोजित राज्यात शुक्रवार (ता.५) पासून यिन सकाळ कला महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. प्रथमच महाविद्यालयीन तरुणाईला आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने शहरासह ग्रामीण भागातील तरूण-तरूणी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यिन व्यासपीठाच्या वतीने राज्यभरातील तरुणाईला एकाच व्यासपीठावर तब्बल १६ स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला सादर करता येणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ज्या महाविद्यालयाने सर्वांत जास्त पारितोषिके मिळविलेले आहेत, अशा महाविद्यालयांना त्या त्या विभागाचे सर्वसामान्य विजेतेपद व उपविजेतेपद देऊन गौरविण्यात येणार आहे.
कला महोत्सवातील स्पर्धा
एकपात्री अभिनय
काव्यवाचन सोलो गायन
स्टँडअप कॉमेडी /नक्कल (मिमिक्री)
फॅशन शो मिस्टर /मिस यिन
सोलो नृत्य, समूह नृत्य
छायाचित्रण, वादविवाद
मूक अभिनय (समूह)
स्किट कॉम्पिटिशन
वक्तृत्व रॅप
कोलाज वर्क
मूक अभिनय
व्यंगचित्र स्पर्धा.
ऑनलाइन नोंदणी शुल्क
सोलोसाठी : १०० रुपये गटासाठी : २०० रुपये
राज्यभर येथे यिन कला महोत्सवाचे आयोजन
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सातारा, अमरावती, नांदेड, नगर औरंगाबाद
महोत्सवातील सहभागसाठी नोंदणींचे टप्पे
‘Young Inspirators Network’ या नावाचे ॲप गुगल प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करा किंवा दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. ॲप डाऊनलोड केल्यानंतर पुढील प्रक्रियेनुसार आपली नोंदणी करा.
ॲप डाउनलोड केलेले असल्यास प्लेस्टोअरवरूनअपडेट करावे
आपल्याला ज्या विभागाच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्या विभागावर जाऊन क्लिक करा.
आवडत्या स्पर्धेचे नाव निवडा
स्वतः आधार कार्ड नंबर अचूक टाकावा. आधार कार्ड आणि कॉलेज आय कार्ड/ बोनाफाईड छायाचित्र अपलोड करावे
आवडत्या स्पर्धेचे शुल्क ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन भरावे
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्याची पावती मेलवर किंवा एसएमएसद्वारे मिळेल
स्पर्धेबद्दलची पुढील माहिती ॲपवर किंवा एसएमएसद्वारे मिळेल.
‘यिन’ कला महोत्सव हा राज्याच्या सर्व विभागात आयोजित होत असलेला एक मोठा महोत्सव आहे. या कला महोत्सवाच्या माध्यमातून आपले कला, गुण सादर करण्यासाठी हजारो युवकांना एक मोठा मंच सकाळ समूहाने उपलब्ध करुन दिला आहे. यातून अनेक कलावंत राज्याला मिळो ही अपेक्षा. ‘यिन’ कला महोत्सवाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.
- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.