महाराष्ट्र बातम्या

Merchant Navy:मर्चंट नेव्हीत नोकरीच्या आमिषाने ,तरुणाची ६५ हजारांची फसवणूक

मर्चंट नेव्हीत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून तरुणाची ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Merchant Navy Recruitment Scam: मर्चंट नेव्हीत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून तरुणाची ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. उंबर्ले काष्टेवाडी येथील शुभम चंद्रकांत दवंडे (वय २६) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे.


याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दवंडे हे २०२२ पासून मर्चंट नेव्हीत कार्यरत आहेत.१९ सप्टेंबरला त्यांचे केरळ येथील मित्राने त्यांना फेसबुकवर मर्चंट नेव्हीतील कंपनीत नोकरीसाठी जाहिरात आली असल्याची माहिती दिली. मित्राने शुभमला नोकरीची गरज असल्याचे या कंपनीला कळवले होते. त्यानुसार शुभम याला अर्ज करण्यासाठीचा मेसेज आला. शुभमने भागेश भाग्यम यांच्या मोबाइलवर त्याचे कागदपत्र पाठवले.

त्यानंतर शुभमला कपिला या बोटीवर २२ सप्टेंबरला हजर होण्यास सांगण्यात आले. त्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र पाठवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर शुभमला ६५ हजार पाठवण्यासाठी सांगण्यात आल्यावर त्याने सांगितलेल्या खात्यात ६५ हजार रुपये फोन पे द्वारे भरले. त्यानंतर त्या व्यक्तीने शुभमचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला.

त्यानंतर शुभमने त्या कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता शुभमला करण्यात आलेली मेलचा पत्ता त्या कंपनीचा नसल्याचे सांगण्यात आल्यावर शुभमला आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने भागेश भाग्यम विरोधात काल (ता. १) दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विवेक आहिरे करत आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT