Suraj Nikam 
महाराष्ट्र बातम्या

Suraj Nikam: वडिलांच्या निधनानं व्यथित झालेल्या युवा पैलवानानं संपवलं स्वतःचं जीवन! सांगलीत शोककळा

Amit Ujagare (अमित उजागरे)

खानापूर : वडिलांच्या निधनामुळं व्यथित असलेल्या सांगलीच्या खानापुरातील सूरज निकम या युवा पैलवानानं स्वतःचं जीवन संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. यामुळं खानापूरसह कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Young wresteler Suraj Nikam hang himself at Sangli Khanapur taluka)

खानापूर तालुक्यातील नागेवाडीचा रहिवासी असलेला पैलवान सूरज निकम यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सूरज निकम हा नामवंत मल्ल होता. त्यानं यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकविले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचं यात त्याचा हातखंडा होता. त्यानं अल्पावधीतच कुस्तीक्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला होता.

कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना त्यानं आस्मान दाखवलं आहे. परंतू आज त्यानं राहत्या घरी गळफास घेवून आपलं जीवन संपविलं. त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो व्यथित होता. त्यातून आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेवून स्वतःचं जीवन संपवल्याचं समोर आलं. निधनाचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. उद्या दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या घटनेचा पोलिस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

SCROLL FOR NEXT