devendra fadanvis devendra fadanvis
महाराष्ट्र बातम्या

‘संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचे समर्थन; त्यांना पाठिंबा देतो’

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कल्याण (पूर्व) येथील प्रथमेश भास्कर पुंडे या तरुण कार्यकर्त्यांने रक्ताने लिहलेले पत्र पाहून संभाजीराजे भावुक झाले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो, असे ट्विट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केले आहे.

सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पर्याय उरला नाही. यामुळे मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संभाजीराजे (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) उपोषणाला बसले. यावेळी त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांविषयी आठवण करून दिली. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.

५ मे २०२१ रोजी आरक्षण रद्द झाले. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने झाली. परंतु, अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झालेली नाही. मी आतापर्यंत आक्रमक होतो. परंतु, आता मी उद्विग्न झाल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले होते. यानंतर त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

केवळ आणि केवळ नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने विविध मागण्यांबाबत आतातरी गंभीर व्हावे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. त्यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपच

मराठा आरक्षणावरून मागील काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. राज्य सरकार व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपच करीत आहे. एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत आहे.फक्त आरोप-प्रत्यारोप होत आहे. निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. यामुळेच मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आंदोलन पुकारले. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT