ED esakal
महाराष्ट्र बातम्या

ED : ईडीची मोठी कारवाई! पनामा पेपर्स प्रकरणात पूनावाला यांची 41 कोटींची मालमत्ता जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः पनामा पेपर्स प्रकरणी आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. झवरेह सोली पूनावाला यांच्या तब्बल ४१ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.

फेमाच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आलेली असून मुंबईतल्या वरळी येथील सीजे हाऊस येथील तीन मालमत्तांची जप्ती करण्यात आलेली आहे. त्याची किंमत ४१ कोटी रुपये आहे. झवरेह पूनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध ईडीची चौकशी सुरु आहे. पनामा पेपर प्रकरणात आज ईडीने ही मोठी कारवाई केली.

पनामा पेपर लिक प्रकरण होतं तरी काय?

जर्मन वृत्तपत्र सुद्देत्सुशे झिएटुंगने पनामा पेपर्स या नावानं ३ एप्रिल २०१६ मध्ये एक डेटा रिलिज केला होता. त्यामध्ये त्यांनी भारताबरोबरच दोनशे देशांमधील राजकारणी, प्रसिद्ध सेलिब्रेटी यांच्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यात १९७७ पासून २०१५ पर्यंत वेगवेगळ्या घटना आणि आरोपांचा समावेश होता. या पेपरमध्ये बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्याच्या नावाचा उल्लेख होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT