Tenth-twelfth exams sakal
महाराष्ट्र बातम्या

पेपर न दिलेल्यांची जुलैअखेर पुरवणी परीक्षा! दहावी-बारावीच्या परीक्षेत सोलापूर कॉपीमुक्त

आजारपणामुळे किंवा अभ्यास न झाल्याने आता परीक्षेला न बसलेल्यांना ऑक्टोबरची वाट पाहवी लागणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जुलै अखेरीस त्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : आजारपणामुळे किंवा अभ्यास न झाल्याने आता परीक्षेला न बसलेल्यांना ऑक्टोबरची वाट पाहवी लागणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जुलै अखेरीस त्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता परीक्षा देणाऱ्यांचा निकाल जूनमध्ये जाहीर होईल आणि पुरवणी परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होतो. त्यामुळे परीक्षेला गैरहजर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात नाही.

जिल्ह्यात एक हजार ५८ माध्यमिक शाळा असून त्याअंतर्गत इयत्ता दहावीच्या वर्गात ५३ हजार ५८४ आणि बारावीच्या वर्गात ६४ हजार ४२४ विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, त्यांनी पेपरला न बसणेच पसंत केल्याचेही दिसून आले. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे परीक्षा पार पडत आहे. एका वर्गात २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून बैठे पथकासह भरारी व विशेष पथकांचा वॉच परीक्षार्थींवर आहे.

पेपर फुटण्याचे अनुभव लक्षात घेऊन बोर्डाने यंदा काही ठोस बदल केल्याने नांदेड पॅटर्न बहुतेक जिल्ह्यांमध्ये प्रभावी ठरत आहे. पेपर सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिका वाटपानंतर परीक्षार्थीला परीक्षेला बसता येणार नाही आणि पेपर सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार पहिल्यांदाच बंद करण्यात आला आहे. कॉपी करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांसह तेथील पर्यवेक्षक व केंद्र संचालकांवर देखील कडक कारवाई करण्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कॉपी प्रकरणे रोखण्यासाठी...

  • जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र भरारी पथक

  • तहसीलदार व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक केंद्रावर बैठे पथक

  • प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, डायट व निरंतर (योजना) शिक्षणाधिकारी, महापालिका प्रशासनाधिकारी यांचे स्वतंत्र पथक

  • झेडपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्तांचीही पथके

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची स्थिती

  • दहावीचे एकूण विद्यार्थी

  • ५३,५८४

  • परीक्षा केंद्रे

  • ११४

  • बारावीचे विद्यार्थी

  • ६४,४२४

  • परीक्षा केंद्रे

  • १७६

जिल्ह्यातील दहावी-बारावीची पोरं हुश्शार

सोलापूर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु झाली. बारावीचे इंग्रजी, मराठी, फिजिक्स, गणित विषयाचे पेपर झाले आहेत. दुसरीकडे दहावीचा मराठी विषयाचा पेपर झाला आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील एक लाख १८ हजार विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळलेली नाही. ‘नांदेड पॅटर्न’ची प्रभावी अंमलबजावणी त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT