milind soman 
मनोरंजन

Video : मिलिंद सोमणने सेल्फीसाठी भररस्त्यात महिलेला काढायला लावले पुशअप्स

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

स्वाती वेमूल

मिलिंद सोमण Milind Soman हा देशातील सर्वांत लोकप्रिय 'फिटनेस आयकॉन' आहे. तीन दशकांच्या मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सर्वाधिक भर दिला आहे. म्हणूनच तो 'फिटनेस फ्रीक' म्हणूनही ओळखला जातो. ५५ वर्षीय मिलिंद त्याच्या फिटनेस व्हिडीओमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. मात्र आता मिलिंदच्याऐवजी एका महिलेचा पुशअप्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द मिलिंदनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (10 Push Ups If You Want A Selfie With Milind Soman watch video)

या महिलेनं मिलिंदसोबत सेल्फी काढण्याची विनंती केली होती. त्यावर १० पुशअप्स केल्यास सेल्फी काढेन, असं मिलिंद तिला म्हणाला. मग काय? त्या महिलेनं कसलाही विचार न करता, साडीत भररस्त्यात अत्यंत आत्मविश्वासाने १० पुशअप्स केले. 'रायपूरमधील एका मार्केटमध्ये मी फिरत होतो. त्यावेळी या महिलेनं माझ्याकडे सेल्फीची विनंती केली. मी १० पुशअप्स म्हणताच त्या महिलेनं कॅमेरा सुरू होण्याआधीच पुशअप्स करण्यास सुरुवात केली. साडी नेसल्याचा, आजूबाजूची लोकं पाहत असल्याचा किंवा आणखी कोणतंही कारण देण्याचा विचार त्या महिलेनं केला नाही. होय, मी करू शकते, या विचारानेच फिटनेस किंवा इतर गोष्टींची सुरुवात होते', असं मिलिंदने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिलिंदची पत्नी अंकिता कोनवारनेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. 'आपल्या डोक्यातंच सर्व संघर्ष असतो. तिथूनच आपण जिंकणार की हरणार हे ठरतं', असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT