12 th Fail Movie Review Vikrant Messey esakal
मनोरंजन

12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

सभोवताली त्याला त्याच्या ध्येयापासून हटविण्याचे खूपच प्रयत्न सुरु आहे. पण तो ऐकेल ते कसला.

युगंधर ताजणे

12 th Fail Movie Review Vikrant Messey : काहीही झालं तरी जिद्द अन् चिकाटी सोडायची नाही ही त्याला पक्कं माहिती आहे. त्यामुळे तो त्याचं आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. सभोवताली त्याला त्याच्या ध्येयापासून हटविण्याचे खूपच प्रयत्न सुरु आहे. पण तो ऐकेल ते कसला. चहा विकण्यापासून टॉयलेट स्वच्छ करण्यापर्यतची सगळी कामं त्यानं निमूटपणे केली आहेत. कारण एकचं त्याला सनदी अधिकारी व्हायचं आहे.

भारतात सनदी सेवेच्या परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतातील सर्वात अवघड परिक्षांमध्ये युपीएससीचे नाव घेतले जाते. लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात त्यातील केवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी अधिकारी पदाचे ट्रेनिंग घेण्यासाठी जातात. प्रचंड संघर्ष, अभ्यास करुनही थोड्याशा फरकानं अपयशाला सामोऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही.

झोप उडवणारी टेक्नॉलॉजीच मिळवून देणार 'स्मार्ट झोप'..!!

प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा हे 12 th Fail या चित्रपटातून वेगळ्या विषयाची मांडणी केली आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे चैन्नई, मध्यप्रदेश, दिल्ली अन् मुंबईमध्ये स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. त्याला जे मान्यवर उपस्थित होते त्यांनी 12 th Fail Movie चे कौतुक केले. यात प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांच्या नावाचाही उल्लेख करावा लागेल. कमल हासन यांनी देखील आपण बऱ्याच दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिला असा उल्लेख केला होता.

मी विधू विनोद चोप्रा यांना या चित्रपटासाठी धन्यवाद देतो. त्यांनी या चित्रपटातून वेगळा विषय हाताळत नवोदितांना प्रेरित करण्याचे काम केले आहे. असेही हासन यांनी म्हटले होते.

आयपीएस मनोज शर्मा यांची बायोग्राफी म्हणून या चित्रपटाकडे पाहता येईल. त्यामध्ये मनोज यांची भूमिका विक्रांत मेस्सी यानं केली आहे. त्यानं जी भूमिका साकारली आहे ती त्याची आजवरची सर्वोत्तम भूमिका आहे असे म्हणावे लागेल. त्यानं प्रेक्षकांना दाद देण्यास भाग पाडलं आहे. इतक्या ताकदीनं मनोजची भूमिका वठवली आहे.

बारावीचा निकाल हाती आला आहे आणि त्यात मनोज नापास झाला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर प्रश्न उभा राहतो की, आपण करायचे काय, अधिकारी तर व्हायचे आहे, पण ती लढाई तर प्रचंड अवघड आहे. त्याचवेळी त्याला सरकारी कार्यालयांमध्ये जे अनुभव येतात ते किती जीवघेणे आहेत याची जाणीव होते त्यातून मनोजच्या मनात काही करुन अधिकारी व्हायचचं अशी जिद्द तयार होते. आणि त्याचा प्रवास सुरु होतो.

गावातून ते स्वप्न घेऊन हजारो युवक शहरात येतात. त्यातून स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशात काहींना क्लास करुन स्पर्धा परिक्षा देणं शक्य होते. काहींना मात्र त्यातून मोठा संघर्ष करावा लागतो असे दिसून आले आहे. १२ वी फेल मधून अशाच स्वरुपाच्या अनेक छोट्या मोठ्या कथा आपल्यासमोर येतात. त्यामुळे आपण अवाक् होतो. अजूनही देशामध्ये किती भीषण परिस्थिती आहे याचा आढावाही दिग्दर्शकानं या चित्रपटातून घेतला आहे.

१२ वी फेलच्या काही वीक पॉइंटविषयी बोलायचे झाल्यास तो म्युझिकच्याबाबत थोडासा कमी पडला आहे. अर्थात चित्रपट आणि त्याची कथा अन् त्याचे सादरीकरण हेच मुळात इतके प्रभावी आहे की, त्यासमोर बाकीच्या गोष्टी सगळ्या फिक्या दिसू लागतात. रक्ताचं पाणी करुन जीवघेण्या संकटांना सामोर जाण्याची ताकद परिस्थिती देते. त्या परिस्थितीला सांगितिक रुपात सादर करण्यात दिग्दर्शक कमी पडला असे म्हणता येणार नाही.

विधू विनोद यांचा हा चित्रपट तुम्हाला मुळापासून हादरवून सोडतो. आपण अजूनही कोणत्या काळात राहतो आहोत याची तुम्हाला आठवण करुन देतो. अजूनही काही गोष्टी आपल्यातून कशा गेल्या नाहीत याउलट त्या अद्यापही तुमच्या मनात कशा घर करून आहेत हे सांगितले आहे. आपलं म्हणणं आणखी प्रभावीपणे कसे सांगता येईल याचा विचार दिग्दर्शकानं या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ विधू विनोद चोप्रा यांनी त्यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांना सडेतोडपणे विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांचे क्रिएशन हा नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. एका मुलाखतीमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी परिंदामधील त्या आठवणी शेयर केल्या होत्या ज्यात नाना पाटेकर यांच्यासोबतच्या भांडणाची त्यांनी आठवण करुन दिली होती.

१२ वी नापास या चित्रपटातून विधू विनोद चोप्रा यांनी अभिनेता विक्रांत मेस्सीकडून जे काम करुन घेतले आहे त्याला तोड नाही. विक्रांतनं देखील त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यामुळेच की काय सगळीकडून त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. एक गरीब विद्यार्थी जो अधिकारी होण्यासाठी काहीही करु शकतो हे शक्य होईल तेवढ्या ताकदीनं दाखवण्याचा प्रयत्न विधू विनोद चोप्रा यांनी केला आहे.

केवळ विद्यार्थीच नाहीतर कुठल्याही वयाच्या प्रेक्षकानं हा चित्रपट जरुर पाहावा असा आहे. त्यातील कथा, भूमिका, संवाद, संगीत, गाणी आणि छायाचित्रण याचा प्रभावी आणि नेमकेपणानं वापर दिग्दर्शकानं करुन घेतला आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा चित्रपट पाहून थिएटरबाहेर येता तेव्हा पूर्णपणे भारावून गेलेला असता. हीच तर १२ वी फेलची मोठी ताकद म्हणावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT