केजीएफ चित्रपटाची हवा सध्या जोरदार सुरू आहे. पहिल्या भागाची हवा होतीच, पण दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा हिरो असलेल्या रॉकीभाईचेही अनेक चाहते आहेत. मात्र या चाहत्यांचं प्रेम चुकीच्या वळणावरही जाऊ लागलेलं आहे. (Boy smoked full packet of cigarette after watching KGF Chapter 2)
हैद्राबादमधल्या एका १५ वर्षांच्या मुलाने केजीएफ चाप्टर २ हा चित्रपट दोन दिवसात तीनवेळा बघितला. त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका केलेल्या रॉकीभाईची प्रेरणा घेत एका पाकिटातल्या सगळ्या सिगरेट्स ओढल्या. यानंतर त्याचा घसा प्रचंड दुखू लागला आणि त्याला कफचा त्रासही सुरू झाला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर डॉक्टरांनी या मुलावर उपचार केले आणि त्याच समुपदेशनही केलं. अशा प्रकारे एखाद्या पात्राकडे आकर्षित होऊन, त्याने प्रभावित होऊन किशोरवयीन मुलं वाहवत जातात. या प्रकरणात रॉकीभाईच्या पात्राने प्रभावित होऊन या मुलाने सिगरेटच्या आख्खा पाकिटाचं सेवन केलं आणि त्यामुळे तो गंभीर आजारी पडला. चित्रपटांचा समाजावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी तंबाखू खाणे, सिगरेट पिणे, दारू पिणे अशा गोष्टींना ग्लॅमर मिळवून देऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.