Tejaswini Pandit
Tejaswini Pandit esakal
मनोरंजन

Tejaswini Pandit: "18 वर्ष..."; मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

priyanka kulkarni

Tejaswini Pandit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आज 18 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तेजस्विनीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

तेजस्विनीची पोस्ट

तेजस्विनीनं इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "18 वर्ष जिद्द आणि चिकाटीची, पुढील वाटचालीस नेगमीप्रमाणे शुभेच्छा"

Raj Thackeray

तेजस्विनीनं केलं राज ठाकरेंचं कौतुक

तेजस्विनीनं अनेक मुलाखतींमध्ये राज ठाकरेंचे कौतुक केलं आहे. एका मुलाखतीमध्ये तेजस्विनी म्हणाली होती, "मी आजही तेच सांगत आहे की, राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीयेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे राज ठाकरेंचे दुर्दैव नाहीये कारण कुठल्याही मराठी माणसाला कोणताही प्रोब्लेम असेल तर तो व्यक्ती राज साहेबांकडे जातो. त्यांच्याबद्दल इतका विश्वास का वाटतो? कारण ते मराठी माणसासाठी काम करत असतात. मला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे"

गेल्या वर्षी तेजस्विनीनं राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं, "आदरणीय राजसाहेब ठाकरे, 20 वर्ष झाली आपल्या परिचयाला! पण संवाद कदाचित हल्लीच झाला. तुमचं खुप कौतुक वाटतं मला...इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व...राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता ! स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात...इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत... राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत!"

"राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे! तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अशा अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे. देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहो.", असंही तेजस्विनीनं पोस्टमध्ये लिहिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hathras Stampede: भोले बाबा आता अडकणार! हाथरस प्रकरणात पहिला खटला दाखल

Jalgaon News : ‘अलार्म चेन’चा गैरवापर हा गंभीर गुन्हा; नियम मोडणाऱ्यांना होऊ शकतो एक वर्षापर्यंत कारावास अन् दंड

Jalgaon Crime News : नंदगावात 2 गटांत घमासान; लोखंडी रॉड, दगडासह तुफान हाणामारी

Uday Samant : 'त्या' घटनेच्या मुळाशी जाणार; पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा, म्हणाले...

'...तर रस्त्यात गाड्या फोडणार, गोमातेसाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ, शेवटचंच सांगतोय'; नीलेश राणेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT