Marathi Movie Jhol Jhal release Google
मनोरंजन

तब्बल 22 विनोदी कलाकार एकाच सिनेमात, 'झोलझाल' ठरणार हास्याचा बूस्टर डोस

मराठी 'झोलझाल' सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर प्रदर्शनाआधीच जोरदार पसंती मिळवली होती.

प्रणाली मोरे

कोविडच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन झोलझाल हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.(Marathi Movie 'Jhol Jhal' release)

या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलीच आहे, मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कमर्शिअल चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवल आहे यांत शंकाच नाही. झोलझाल या चित्रपटात तब्बल २२ कलाकारांनी मिळून जो काय गोंधळ घातलाय तो खरंच पाहण्यासारखा आहे. एका महालाभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे कसे झोलझाल करतय हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेलच.

Marathi Movie Jhol Jhal

झोलझाल' चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला चित्रपटगृहात आले आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला असून वैशाली सामंत, अवदूत गुप्ते, आदर्श शिंदे या फेमस गायकांच्या स्वरात स्वरबद्ध केलेली गाणी थ्रीकायला खर्च भाग पाडतायत. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, उदय टिकेकर, सयाजी शिंदे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, अंकुर वाधवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून या कलाकारांच्या भूमिका चित्रपटांत निव्वळ पर्वणीच ठरल्या आहेत. तब्बल २२ कलाकारांनी एकत्र येऊन या चित्रपटात नेमका काय धिंगाणा घातलाय हे आजपासून मोठ्या पडद्यावर पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस आला असून दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू पेलवली आहे. तर चित्रपटाची निर्मिती निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली. तर चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. माननीय अमेय खोपकरजी हे चित्रपटाचे वितरक म्हणून जबाबदारी पेलवत आहेत.

'अमोल लक्ष्मण कागणे' प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलिंगडाईस' असोसिएशन सोबत, निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट हास्याची मेजवानी घेऊन आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे, तर मायबाप प्रेक्षकांनी हा हास्याचा बूस्टर डोस आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की घ्यावा ही विनंती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT