25 Years of Satya: हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट बनले आहेत. ज्या चित्रपटांची आजपर्यंत कोणताही चित्रपट स्पर्धा करु शकला नाही. 25 वर्षांपूर्वी राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला 'सत्या' हा चित्रपट त्यापैकीच एक आहे.
अंडरवर्ल्डच्या कथेभोवती फिरणारा हा चित्रपट आजपर्यंतच्या भारतीय चित्रपटांच्या इतिहासात एक कल्ट क्लासिक मानला जातो. आज या चित्रपटाने प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण केली आहेत.
९० च्या दशकात ‘सत्या’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचा टर्निंग पॉइंट म्हणूनही ओळखला जात होता. हा चित्रपट 25 आठवडे थिएटरमध्ये राहिला. मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटातील भिकू म्हात्रेची भूमिका आजही बॉलिवूडमधील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक मानली जाते. (latest marathi news)
उर्मिला मातोंडकर आणि जे.डी. चक्रवर्ती यांच्या भूमिकांशिवाय आणि नंतर कथेला आकर्षक बनवणारी सशक्त पटकथा आणि 'गोली मार भेजे में' सारख्या गाण्यांशिवाय हा चित्रपट अपूर्णच होता, ज्याला अजूनही मोठा प्रतिसाद मिळतो.
चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत असताना अनुराग कश्यपने 'सत्या'च्या आठवणी ताज्या केल्या आहेत. अनुरागने २५ वर्षापूर्वीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सर्व कलाकार दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.