70s bold actress zeenat aman birthday she broken all stereotype of other actress  sakal
मनोरंजन

Zeenat Aman birthday: 70च्या दशकातला बोल्डनेसचा कहर! झीनत अमानने ओलांडल्या होत्या सर्वच मर्यादा..

70 च्या दशकात सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत अमान यांची ओळख बनली होती.

नीलेश अडसूळ

Zeenat Aman : आजही जिथे कपड्यांच्या मर्यादा बाळगल्या जातात. कसे राहावे कसे राहू नये याबाबत अनेक बंधन घातली जातात. पण 70 च्या दशकात या सर्व मर्यादा मोडीत काढून अभिनेत्री झीनत अमान यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. कायम अत्यंत बोल्ड अंदाजात समोर येणाऱ्या या अभिनेत्रीने 70-80 ची दशकं अक्षरशः गाजवली. त्याच झीनत अमान यांचा आज वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांची बोल्ड फॅशन आणि गाजलेले चित्रपट..

(70s bold actress zeenat aman birthday she broken all stereotype of other actress )

सत्तरच्या दशकात म्हणजे आजपासून जवळपास 50 वर्षे मागे बिकिणी पासून ते ट्रान्सपरंट साडीपर्यंत सर्व काही कपड्यांचे प्रयोग अत्यंत धिटाईने करणारी अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. आज त्यांचा 71 वा वाढदिवस. झीनत यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडला वेड लावलंच शिवाय स्वतःच्या बोल्ड फॅशनमुळे एक वेगळा माईलस्टोन सेट केला आणि नंतरच्या अभिनेत्रींनाही एका नव्या फॅशनची वाट मोकळी करून दिली.

70च्या दशकात झीनत यांनी महिलांसाठी असलेल्या सर्व मर्यादा मोडून काढल्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या गाजलेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात तर त्या ब्लाऊजलेस दिसल्या होत्या. याशिवाय कित्येक चित्रपटात त्या बिकिणी आणि अत्यंत शॉर्ट कपड्यात दिसल्या होत्या.

झीनत यांनी 'फेमिना मिस इंडिया' आणि 'मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल' हे किताब जिंकले आहेत. 'हलचल' या सिनेमाच्या माध्यमातून झीनत यांनी बॉलिवूडमध्ये पदर्पण केले. त्यानंतर त्यांनी 'हरे रामा हरे कृष्णा', 'यादों की बारात', 'रोटी कपडा और मकान', 'अजनबी', 'डॉन', 'धरमवीर', 'धुंध', 'कुर्बानी', 'इंसाफ का तराजू', 'वॉरंट','पुकार', 'दोस्ताना', 'डार्लिंग डार्लिंग', 'सत्यम शिवम सुंदरम', 'छैला बाबू','हम किसी से कम नहीं', 'लावारिस' आणि 'चोरी मेरा काम' अशा अनेक सिनेमांत काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT