75th Independence Day: Bollywood Celebrity share photo, video of celebration. Google
मनोरंजन

75th Independence Day: देशभक्तीत न्हाऊन निघाले बॉलीवूडकर,दिला एकतेचा संदेश

आज प्रत्येक कलाकारानं मोदींच्या 'हर घर तिरंगा' अभियानाला पाठिंबा देत 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला.

प्रणाली मोरे

75 th Independence Day: आज संपू्र्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात लोक भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं 'हर घर तिरंगा' अभियानाशी जोडले गेले आहेत आणि भारतीय झेंड्यासोबत आपला फोटो क्लीक करुन सोशल मीडियावर एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या(Independence Day) शुभेच्छा देत आहेत. आता एवढं सगळं होत असताना आपलं बॉलीवूड कसं मागे राहिल बरं. कितीतरी सेलिब्रिटींनी भारतीय तिंरगा फडकवत देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (75 th Independence Day: Bollywood Celebrity share photo, video of celebration).

बॉलीवूडचे महानायक असं बिरुद मिरवणाऱ्या अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची स्वातंत्र्य दिनाची पोस्ट तर मन जिंकणारी आहे. आता उगाच का त्यांना बॉलीवूडचा शहनशाह म्हणतात का. १५ ऑगस्टचं निमित्त साधून अमिताभ यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत देशाला एकात्मतेचा संदेश दिला आहे आणि स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अमिताभ यांनी राष्ट्रीय गीत जन-गण-मन ला मूकाभिनयाच्या माध्यमातून सादर केलं आहे. या व्हिडीओत अमिताभसोबत दिव्यांग मुलं देखील परफॉर्म करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आपलं मन जिंकून घेतो. या व्हिडीओला शेअर करत अमिताभ यांनी कॅप्शन दिलं आहे,'जय हिंद..'

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीनं एक फोटो शेअर केला आहे. दोघांनीही भारतीय तिरंग्यासोबत फोटो पोझ देत त्याला कॅप्शन दिलं आहे,''आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष. जगभरातील भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा''.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान देखील देशभक्तीच्या रसात कुटुंबासोबत डुंबताना दिसला. त्यांच्या पूर्ण खान कुटुंबाने आपल्या मन्नत बंगल्याच्या गच्चीवर भारताचा तिरंगा फडकावला. तिरंग्यासोबत फोटोही काढले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी, मुलगा आर्यन,अब्राहम असे उपस्थित होते. शाहरुखने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,''आपल्याहून लहानांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या स्वातंत्र्यवीरांचा इतिहास समजावून सांगायला आणखी थोडा वेळ लागेल पण त्यांच्या हातात तिरंगा देऊन तो फडकताना पाहण्याचा आनंद काही औरच''.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनं देखील पारंपरिक पेहरावात झेंडावंदनाचा आनंद घेतला. श्रद्धानं पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती हातात तिरंगा घेऊन तो फडकवताना दिसत आहे. हर घर तिरंगा अभियानात सामिल झालेल्या श्रद्धानं पोस्ट करत 'वंदे मातरम' हे समर्पक कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे.

अनिल कपूर यांनी तर एक एनर्जेटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात हातात झेंडा पकडून धावायचा आनंद घेताना ते दिसत आहेत. अनिल कपूर यांनी ७५ व्या स्वांतंत्र्य दिनानिमित्तानं हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे,''ताठ मानेनं पुढे जाताना...जय हिंद''

अनुपम खेर हे असे अभिनेते आहेत जे नेहमीच देशाप्रती पोस्ट करत आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांनी देखील सोशल मीडियावर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ''देश प्रत्येक क्षेत्रात भरपूर प्रगती करत जावो,भारत माता की जय''.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने देखील तिरंग्यासोबत फोटो शेअर करत लिहिलं आहे, ''शूरवीरांच्या बलिदानानं आम्हाला स्वातंत्र्याचं मोल कळालं आहे. आपण ते स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया. स्वातंत्र्याच्या शुभेच्छा''.

बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगणने देखील शूटिंगमधून वेळ काढत वेगळ्या अंदाजात स्वातंत्र्य दिन साजरा केला. अजय शूट करत असलेल्या सेटवर सर्वांनीच भारतीय छेंडा आपल्या छातीवर अभिमानानं लावला होता. अजयनं सेटवरचा स्वातंत्र्यात रंगलेला माहोल दाखवणारा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, ''स्वातंत्र्याची ७५ वर्ष. आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण, एकमेकांना सहकार्य करुन पुढे जाऊया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT