Kedar Shinde, Shahir Sabale, Maharashtra Shaheer SAKAL
मनोरंजन

आजोबांनी हेच शिकवलं का? कानाखाली देईल..! या घटनेनंतर Kedar Shinde चे डोळे खाडकन उघडले

शाहीर साबळेंचा नातू आहे या गोष्टीचा केदार शिंदे यांना गर्व होता.

Devendra Jadhav

Kedar Shinde News: केदार शिंदे आगामी शाहीर साबळे सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. आपले आजोबा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचं शूटिंग सध्या अखेरच्या टप्प्यावर असून केदार शिंदे सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहेत.

सिनेमाचं प्रमोशन जोरात सुरु असताना केदार शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली एक भावुक गोष्ट सांगितली. या घटनेमुळे केदारे शिंदे यांच्या आयुष्यावर काहीसा परिणाम झाला.

(A major event that affects the life of Kedar Shinde related his grandfather shahir sabale)

केदार शिंदे तेव्हा ऐन उमेदीत होते. तरुणपणात सगळ्यांच्या अंगात एक रग असते, ताकद असते. आपण जग जिंकू शकतो असा एक माज असतो. केदारे शिंदे सुद्धा याला अपवाद नाहीत. केदार शिंदे, अंकुश चौधरी, भरत जाधव, संतोष पवार यांचा एक ग्रुप होता.

केदार त्यावेळी त्यांच्या आजोबांकडे म्हणजेच शाहीर साबळेंकडे राहायचे. शाहीर साबळेंचा नातू आहे या गोष्टीचा केदार शिंदे यांना गर्व होता.

एके दिवशी केदार शिंदे त्यांच्या ग्रुप सोबत एकांकिका स्पर्धा संपवून घरी जात होते. रात्रीचे दीड वाजले होते. साईबाबा पथ वरुन सरळ गेलं कि करी रोड येतं.

केदार शिंदे अंकुश, भरत सोबत तिथून चालत जात होते. इतक्यात पोलिसांची जीप आली आणि त्यांनी केदारला हटकलं. सगळेजण थोडे घाबरले. पण केदार म्हणाले,"टेन्शन घेऊ नका.. मी बोलतो त्यांच्याशी.."

केदार वेगळ्याच माजात पोलिसांना भेटायला गेले. इतक्या रात्री काय करताय इथे.. असं पोलिसांनी विचारलं. त्यावर सरळ उत्तर द्यायचं सोडून केदार म्हणाले.. मी शाहीर साबळेंचा नातू आहे.

हे ऐकताच पोलीस भडकले.. मग काय आजोबांनी हेच शिकवलं का? रात्री - अपरात्री रस्त्यावर फिरायला.. गप्प घरी जायचं नाहीतर कानफडात मारेन.. हे ऐकताच केदार शिंदेचा सगळा माज एका क्षणात खाली उतरला.

त्या दिवसापासून केदार शिंदे यांना आयुष्याची नव्याने जाणीव झाली. यापुढे कधीही कोणालाही शाहीर साबळेंचा नातू आहे म्हणून सांगायचं नाही, असं केदार शिंदे यांनी ठरवलं.

महाराष्ट्र शाहीर या सिनेमात केदार शिंदे नातू म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून समर्पित भावनेने सिनेमा बनवत आहेत, याची केदार शिंदे यांना जाणीव आहे. २८ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT