a young man fell from panhala fort during vedat marathe veer daudale saat shooting in kolhapur sakal
मनोरंजन

तरुण दरीत कोसळला! 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना..

कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्यावर चित्रीकरणादरम्यान एक तरुण दारीत कोसळला.

नीलेश अडसूळ

Accident News in kolhapur: गेले काही दिवस 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची बरीच चर्चा होती. हा चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता या चित्रपटावर नवे संकट ओढवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात पन्हाळा परिसरात सुरू असताना एक तरुण कलाकार दरीत कोसळला आहे.

(a young man fell from panhala fort during vedat marathe veer daudale saat shooting in kolhapur)

कोल्हापूरमधील पन्हाळगडावर एक दुर्घटना घडली आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे. शनिवारी 18 मार्च रोजी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो गंभीर जखमी आहे.

आगामी मराठी चित्रपट 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात होता. यावेळी तो फोटोग्राफीसाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. त्यावेळी पाय घसरून तो दरीत पडला. त्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.


या घटनेमुळे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आधी या चित्रपटातील सात मावळ्यांचे पोशाख आणि त्यांना दिलेले रूप यावरून बोलले गेले. मग महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर मावळा वाटतो का, यावरूनही खूप टीका केली गेली. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT